विकिपीडिया:मराठी विकिप्रकल्प इंटर्नशिप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पार्श्वभूमी[संपादन]

पुण्यातील न्यू लॉ कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी बिकिस्रोतावर आयोजीत केलेल्या इंटर्नशीप प्रकल्पाचा सकारात्मक अनुभव जमेस धरता, आणि आता पर्यंतच्या घेतलेल्या कार्यशाळांतील अनुभवावरुन मराठी-भाषी विद्यार्थ्यांना विकिप्रकल्पात दीर्घकालावधीसाठी जोडून घेण्याच्या दृष्टीने त्यांच्या भावी करिअरला उपयोगी पडू शकतील अशा उपयोजीत म्हणता येऊ शकेल अशा प्रकारच्या विषयांमध्ये संस्थात्मक पातळीवरुन प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकेल अशी इंटर्नशीप आणि फेलोशीपची संधी उपलब्ध करता येऊ शकेल का ते पहाणे हा या विकिप्रकल्पाचा उद्देश्य आहे.

या संदर्भाने पंढरपूरच्या दयानंद महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि विभाग प्रमुखांशी प्राथमीक चर्चा केली असता व त्यांनीही या विषयात दाखवलेला उत्साह पाहता असे प्रस्ताव राज्य मराठी विकास संस्थेसमोर सादर करावा असे वाटते. या पद्धतीने मराठी विकिप्रकल्पातील उपयोजीत, तांत्रिक आणि कायदे विषयांना पाठबळही उपलब्ध करता येऊ शकेल.

कायदा आणि कॉपीराईट विषयक[संपादन]

या इंटर्नशीपसाठी कायदा विषयांच्या अभ्यासकांप्रमाणे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना संधी देता येईल, पेटंट आणि डिझाईन विषयक कायदे आणि न्यायिक निकलांच्या बाबत सायन्सच्या विद्यार्थ्यांनाही इंटर्नशीप सहभाग देता येईल.

 • इंग्रजी आणि मराठी विकिस्रोतातील भारतीय कायदा आणि कॉपीराईट विषयक कॉपीराईट फ्री पानांचे संकलन, प्रुफरिडिंग, व्हॅलीडेशन, क्रॉस व्हेरीफिकेशन, कंपायलेशन, ॲनोटेशन, अनुवाद करणे.
 • मराठी विकिप्रकल्पासाठी लागणाऱ्या क्रिएटीव्ह कॉमन्स लायसन्सेसची भारतीय कॉपीराईट कायद्यांच्या परिपेक्षातून एरीआ ऑफ डिफरन्स आणि ॲप्लिकॅबिलीटी तपासणे.
  • लेखी स्वरूपात घ्यावयाच्या प्रताधिकार मुक्ती उद्घोषणांचे (उदाहरणार्थ अनुकुलीत फॉर्म आय) नमुने भारतीय कॉपीराईट कायद्यांच्या परिपेक्षातून एरीआ ऑफ डिफरन्स आणि ॲप्लिकॅबिलीटी तपासणे आणि अद्ययावत करणे.
 • छायाचित्रे, ध्वनी-चल चित्रांचे, लोगो, जाहीराती, पोस्टर्स, पुस्तक कव्हर्स, व्यक्ति छायाचित्रे, पुस्तके, भारतीय कॉपीराईट कायद्यांच्या परिपेक्षातून एरीआ ऑफ डिफरन्स आणि उचित वापर पॉलीसी आणि पब्लिक डोमेन ॲप्लिकॅबिलीटी तपासणे.
 • मराठी विकिप्रकल्पातील डिसक्लेमर्स भारतीय कायदे विषयक परिपेक्षातून तपासणे.
 • भारतीय घटनेचे आणि कायद्यांचे अनुच्छेद आणि कलमवार आणि विषयवार अद्ययावत न्यायालयीन निर्णयावर आधारीत ज्ञानकोशीय लेखनात सहभाग घेणे, विकिपीडिया पॉलीसी मेकिंगसाठी उपयूक्त विकिपीडिया नामविश्वात साहाय्यपर लेखन आणि मार्गदर्शन करणे.
 • मराठी विकिबुक्सवर विकिस्रोतातील कायदे आणि मराठी विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांवर आधारीत प्रश्नोत्तर सदराची रचना करणे.
 • मराठी विकिप्रकल्पातील मथळा सजगता संदेशांना अद्ययावत करणे.
 • कॉपीराईट व्यतरीक्त कायदा विषयाच्या विद्यार्थ्यांना/ अभ्यासकांना करीअरसाठी उपयूक्त खालील प्रकारच्या कायदे विषयक लेखनात त्यांना सहभागी करुन घेणे:
 1. कमर्शीअल लॉ
 2. टॅक्सेशन लॉ
 3. कॉर्पोरेट लॉ
 4. इंडस्ट्रीअल आणि लेबर लॉ
 5. प्रॉपर्टी आणि क्रिमीनल लॉ
 6. तर्कशास्त्र आणि तार्कीक उणीवा
उच्च न्यायालयांचे वकील, कार्पोरेट एच आर एक्झीक्यूटीव्हज आणि प्लेसमेंट एजन्सी प्रमुखांना संबंधीत शासकीय आणि न्यायिक संस्था प्रमुखांना विषयतज्ञ म्हणून बोलावणे म्हणजे अधिक वरच्या लेवलच्या संधी विद्यार्थ्यांना भविष्यात उपलब्ध होऊ शकतील या विश्वासाने विद्यार्थी क्वालिटी वर्क करण्याकडे लक्ष्य देतील.

काँप्यूटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना उपयूक्त तांत्रिक विषय[संपादन]

 • मराठी विकि प्रकल्पांच्या कॉमन.js आणि कॉमन.css इत्यादी पानांची इंग्रजी, जर्मन, जपानी आणि कन्नड, मल्याळम भाषातील पानांशी तुलना करुन मराठी विकिप्रकल्पांवरील संबंधीत पाने सायबर सुरक्षीत आणि अद्ययावत बनवण्याच्या दृष्टीने अभ्यासपूर्ण सुचना मांडणे.
 • मराठी विकिप्रकल्पां मध्ये इतरभाषी प्रकल्पांशी तुलना करुन उपयूक्त तांत्रिक साधन सुविधा सायबर सुरक्षीत आणि अद्ययावत बनवण्याच्या दृष्टीने सुचना मांडणे.
 • मराठी विकिपीडियासाठी साईट (संदर्भ) टूल आणि अपलोड विझार्डची तयारी करुन ठेवणे.
 • इंग्रजी आणि इतर भाषी विकिपीडियावरील काँप्लेक्स साचे मराठी विकिपीडियावर आणि दृष्य संपादनातून उपलब्ध करण्याच्या दृष्टीने तांत्रिक साहाय्य पुरवणे.
 • मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांसोबत शुद्धलेखन चिकित्सा करणारे आणि विशेषण वगळणारे बॉट अद्ययावत करणे आणि वापरणे
 • मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांच्या आणि बॉट्सच्या साहाय्याने प्रताधिकारमुक्त डिक्शनरींचा आधार घेऊन विक्श्नरी प्रकल्प पूर्ण करणे.
 • सजगता संदेशांसाठी रोचक जिआयएफ बनवणे.
 • मराठी विकिपीडियातील साहाय्यासाठी तसेच मराठी विकिपीडियावरील मासिक सदर लेखांवर आधारीत ऑडीओ व्हिज्यूअल क्लिप्स बनवणे.
 • मिडियाविकि ॲप्लिकेशन्सच्या डेव्हेलपमेंट मध्ये भाग घेणे. खास करुन ULS आणि संपादन गाळण्यांसाठी लागणारे सॉफ्टवेअर अभ्यासून अद्ययावत करण्यात सहभाग घेणे.
 • आंतरराष्ट्रीय हॅकॅथॉन घेऊन मोडी लिपीसाठी विकिपीडिया/विकिस्रोतवर वापरता येतील असे फाँट आणि टायपिंग सुविधा, ओसीआर आणि मोडी ते देवनागरी कन्व्हर्टर बनवून घेणे.
MediaWiki साचापृष्ठ निर्वाह उपयोग
Devanagari Support  पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास MediaWiki:Sitenoticeकरिता उपसाचा
मिडियाविकी:Monobook.js  पहा   −   [[talk:MediaWiki:Monobook.js|चर्चा]]   −   संपादन  −  इतिहास
मिडियाविकी:Vector.js  पहा   −   [[talk:MediaWiki:Vector.js|चर्चा]]   −   संपादन  −  इतिहास
मिडियाविकी:Monobook.css  पहा   −   [[talk:MediaWiki:Monobook.css|चर्चा]]   −   संपादन  −  इतिहास
मिडियाविकी:Common.css  पहा   −   [[talk:MediaWiki:Common.css|चर्चा]]   −   संपादन  −  इतिहास
मिडियाविकी:Common.js  पहा   −   [[talk:MediaWiki:Common.js|चर्चा]]   −   संपादन  −  इतिहास
मिडियाविकी:Edittools  पहा   −   [[talk:MediaWiki:Edittools|चर्चा]]   −   संपादन  −  इतिहास Edittoolsसंपादन खिडकी खालील मजकुर आणि संपादन सहाय्य साधने
मिडियाविकी:Uploadtext/mr-nonfree पानाबद्दलची माहिती खाली तळटीप जोडण्याकरिता पहा
मिडियाविकी चर्चा:Uploadtext/mr-nonfree

आर्ट्स शाखेचे विद्यार्थी[संपादन]

 • आर्ट्स शाखेच्या विद्यार्थ्यांना विकिस्रोत प्रकल्पात मराठी, मराठी व्याकरण, इतिहास, शिक्षणशास्त्र विषयक पुस्तकांचे प्रुफरिडिंग, व्हॅलीडेशन, क्रॉस व्हेरीफिकेशन, कंपायलेशन, ॲनोटेशन, अनुवाद करणे ही कामे इंटर्नशीप मध्ये देता येऊ शकतील जी त्यांना स्पर्धात्मक परिक्षांसाठी उपयूक्त ठरु शकतील त्यांनंतर त्यावर आधारीत विकिपीडिया लेखनाशी जोडून घेणे, विकिपीडिया कार्यशाळातून साहित्यिकांच्या मुलाखती घेऊन त्या आंतरजालावर प्रकाशित करणे.
  • परभाषा अभ्यास करणाऱ्या आणि मराठी भाषा विद्यार्थ्यांचे ग्रूप बनवून प्रताधिकारमुक्त मराठी साहित्यिकांचे आणि तत्वज्ञांचे लेखन मराठी ते पर भाषा अनुवादीत करणे.
  • परभाषा ते मराठी अनुवादात सहभाग घेणे.
  • मराठी भाषेच्या प्राध्यापकांच्या साहाय्याने इतर शाखातील इंटर्नशीप कार्यक्रमांमध्ये परिभाषा निर्मिती आणि अनुवादात सहभाग घेणे.
 • इतिहासाच्या विद्यार्थ्यांकडून इतिहासाची प्रमाण साधने या विषयावर ज्ञानकोशीय लेखन करुन घेणे
 • पत्रकारीतेच्या विद्यार्थ्यांना कॉपीराईट, मृत लेखकांची मृत्यू वर्षे शोधणे, विकिपीडिया कार्यशाळातून साहित्यिकांच्या मुलाखती घेऊन त्या आंतरजालावर प्रकाशित करणे, विकिस्रोत आणि विकिपीडियावरील अनुवादात सहभागी करुन घेणे.

कॉमर्स शाखेचे विद्यार्थी[संपादन]

 • आर्ट्स आणि विज्ञान विषयक विद्यार्थ्यां सोबत ग्रूप बनवून वाणीज्य, व्यवस्थापन, ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या औद्योगिक आणि व्यापारी संस्था, उद्योजक विषयक ज्ञानकोशीय लेखांवर लेखन करणे.
 • कायदे विषयक विकिपीडिया कार्यशाळात भाग घेऊन कॉपीराईट आणि इतर वाणीज्य विषयक कायद्यांना विकिस्रोत प्रुफ रिडींग आणि विकिपीडिया लेखांत सहभाग घेणे.
  • कला शाखेच्या विद्यार्थ्यांसोबत न्यायिक निकालांच्या अनुवादात सहभाग घेणे.