विकिपीडिया:नो ओपन प्रॉक्सीझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील मजकूर मीडियाविकिच्या नियमावलीतून घेतलेला आहे.


हे धोरण ओपन प्रॉक्सीझवरून मराठी विकिपीडियावरील संपादनांना बंदी घालण्याबाबत आहे. बंदी घालण्याचे धोरण [१] विकिमीडियाच्या सार्वत्रिक धोरणावर आधारित आहे याबद्दल फेब्रुवारी, इ.स. २००४मध्ये चर्चा झाली होती आणि हे धोरण मार्च, इ.स. २००६ मध्ये अमलात आणले गेले.

जर तुम्ही केलेली संपादने अशा प्रतिबंधनाने बाधित झाली असतील तर मराठी विकिपीडियाच्या प्रचालकांशी संपर्क साधा.

धोरण

ओपन प्रॉक्सी किंवा आयपी अंकपत्ता बदलणाऱ्या प्रॉक्सी सर्व्हरांवर[मराठी शब्द सुचवा] कोणत्याही क्षणी कितीही काळासाठी बंदी घातली जाऊ शकते. अशा बंदीचा रोख विकिपीडियाच्या निर्दोष सदस्यांवर नसला, तरी बंदीमुळे त्यांची काही संपादने प्रभावित होऊ शकतील. अशा बंदी घातल्या गेलेल्या प्रॉक्सी सर्व्हरांद्वारे मराठी विकिपीडियावरील मजकूर वाचण्यास कोणतीही बंदी किंवा मज्जाव नाही.

अशा प्रॉक्सी जाणूनबुजून खुल्या ठेवल्या जातात/चुकून खुल्या राहतात. अनेकदा ही कृती हॅकरद्वारे सर्व्हरच्या मालकाच्या माहितीशिवाय केली जाते. कधीकधी ही कृती मुद्दामहून खोडसाळपणा करण्यासाठीही केली जाते. अस्थानीय (नॉन-स्टॅटिक) आयपी अंकपत्ते असलेले प्रॉक्सी सर्व्हर किंवा जाणूनबुजून खुल्या ठेवलेल्या/अनवधानाने खुल्या राहिलेल्या प्रॉक्सी कायमच्या प्रतिबंधित करू नयेत. एखाद्या सर्व्हरवरील खुली प्रॉक्सी बंद केल्याची खात्री झाल्यावर त्याच्या अंकपत्त्यावरचे प्रतिबंधन काढून टाकतील.

अपवाद

जरी एखाद्या आयपी अंकपत्यावर प्रतिबंध असला तरीही लेखन करता येऊ शकते. यासाठी अशी प्रॉक्सी वापरणाऱ्या सदस्याने इतर अंकपत्यावरून प्रचालकांशी संपर्क साधावा. अशा वेळी प्रचालक त्या लेखकाचे योगदान तपासून पाहतील व खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्तींपैकी हा लेखक नसल्याची खात्री झाल्यावर त्यास अंकपत्ता प्रतिबंधन सूट देतील.

अनेकदा संपादक आपल्या न्याहाळकातील सेटिंगची माहिती नसल्याने अनवधानाने खुल्या प्रॉक्सीझ वापरीत असतात, तरी अशी सूट मिळण्याची विनंती करण्या आधी आपल्या न्याहाळकातील आंतरजाल कनेक्शन प्राथमिकता बघावेत आणि त्यातील प्रॉक्सी वापरण्याची मुभा काढून टाकावी.