विकिपीडिया:नकल-डकव धोरणे
Appearance
हे पृष्ठ मराठी विकिपीडियाचे एक धोरण सादर करीत आहे. हे, सर्वसामान्यपणे स्वीकारलेल्या एका मानकाचे वर्णन करते, ज्याचे सर्व सदस्य/संपादक साधारणपणे अनुसरण करतात. या धोरणात काही बदल करावयाचा असल्या तो बदल विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे पानावर प्रस्तावित करणे व मंजूर करणे आवश्यक आहे. |
मराठी विकिपीडियावर इतर स्रोतांतून नकल-डकव (कॉपी-पेस्ट) केलेला मजकूर चालत नाही.
- असे करणे बव्हंश वेळा प्रताधिकारभंग ठरतो आणि यावर कायद्याने कारवाई होऊ शकते.
नकल-डकव सापडल्यास काय केले जाईल
- नकल-डकव सिद्ध झाल्यास असा मजकूर कोणताही संदेश दिल्याशिवाय लगेचच वगळला जातो.
- नकल-डकव करणाऱ्या सदस्यास असे न करण्याबाबत संदेश दिला जातो. या सदस्याने नकल-डकव केल्याची नोंद वेगळ्या पानावर केली जाईल. या पानावर फक्त प्रचालक बदल करू शकतात.
- दोन वेळा ताकीद दिल्यावरही पुन्हा नकल-डकव केल्यास सदस्याला मराठी विकिपीडियावरुन किमान ७ दिवस तडीपार केले जाईल. नेमकी मुदत प्रचालकांचा निर्णय असेल.
- तडीपार सदस्यांनी इतर प्रकारे (उदा. पाळीव खाते वापरुन अथवा नवीन खाते तयार करुन) नकल-डकव सुरू केल्यास इतर उपाय योजले जातील.
नकल-डकव कशी शोधावी
- विकिमीडिया लॅबने तयार केलेले कॉपीव्हायो नावाचे संयोजन आंतरजालावरील नकल-डकव लगेच आणि सोप्या पद्धतीने शोधून काढते - https://tools.wmflabs.org/copyvios/
- पुस्तके, नियतकालिके आणि स्रोत आंतरजालावर नसलेली नकल-डकव सापडल्यास {{प्रताधिकारित मजकूर शंका}} हा साचा अशा लेखांमध्ये लावावा.