विकिपीडिया:क्रीडा/खेळ/2

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बास्केटबॉल हा एक सांघिक खेळ आहे. ५ खेळाडूंचे दोन संघ चेंडू बास्केटबॉल जाळीमधे टाकुन अधिकाधीक गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. सर्वसाधारण बास्केटबॉल जाळीचा व्यास १८ इंच (४५.७ सेंमी) असतो व जाळी १० फूट (३.०५ मी) उंचीवर बॅकबोर्डला लावलेली असते. संघाला गुण मिळवण्यासाठी चेंडू जाळीत टाकावा लागतो. चेंडू जाळीत टाकणारा खेळाडू जर थ्री पॉइंट लाईन[मराठी शब्द सुचवा] च्या आत असेल तर २ गुण मिळतात अथवा ३ गुण मिळतात. जास्तीत जास्त गुण मिळवणारा संघ विजेता घोषित केला जातो. गुण संख्या समसमान झाल्यास अतिरिक्त वेळ वापरल्या जातो. चेंडू पुढे नेण्यासाठी चेंडू टप्पे देउन चालतांना नेता येतो अथवा पळून किंवा संघ खेळाडूला [मराठी शब्द सुचवा]पास करता येतो. चेंडू चालतांना दोन वेळा बाउंस[मराठी शब्द सुचवा] केल्यास किंवा हातात धरून चालल्यास नियमांची पायमल्ली होते.नियमांची पायमल्लीला फाउल असे म्हणले जाते. धोकादायक शारीरीक [मराठी शब्द सुचवा]कॉन्टॅक्ट साठी पेनाल्टी लावल्या जाते.

अधिक माहिती..