विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/५ नोव्हेंबर २०११

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वसंतगड.jpg

वसंतगड महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील किल्ला आहे. हा किल्ला पुणे-बंगळुरु हा राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रज आणि कर्‍हाड यांच्या मध्ये रस्त्याच्या पश्चिमेकडे आहे. तळबीड गाव वसंतगड या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.

या महामार्गावर तळबीड फाट्याला उतरुन तीन कि.मी. पश्चिमेकडे असलेल्या तळबीडला जावे लागते. कर्‍हाडवरुन एस.टी. बसेस ची सोय आहे. उदयोन्मुख लेख/५ नोव्हेंबर २०११ इतिहासप्रसिद्ध अशा तळबीड परिसराचे रक्षण करणारा किल्ला होता. मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांची कन्या रणरागिणी महाराणी ताराबाई या तळबीड गावचे होते.

(पुढे वाचा...)