विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/१० जून २०१२
एरबस ए-३४० (इंग्लिश: Airbus A340) मोठ्या प्रवासीक्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. चार इंजिने असलेले हे विमान २६१ ते ३८० प्रवाशांना ६,७०० ते ९,००० मैल (१०,८०० - १४,६०० कि.मी)पर्यंत नेऊ शकते. या विमानाची रचना एरबस ए-३३० या विमानासारखी आहे.
ए ३४०चे लांबीनुसार चार उपप्रकार आहेत. ए ३४०-३०० हा ५९.३९ मीटर लांबीचा पहिला उपप्रकार इ.स. १९९३पासून तयार केला गेला. -२०० हे त्याहून छोटे विमान आहे. ए ३४०-६०० हा -२०० पेक्षा १५.९१ मीटर जास्त लांबीचा आहे. -५०० हा सगळ्यात मोठा पल्ला असलेला उपप्रकार आहे. -३०० आणि -२०० उपप्रकारांवर वर सीएफएम५६-५सी प्रकारची इंजिने असतात. यांची क्षमता प्रत्येकी १५१ किलोन्यूटन आहे. -५०० आणि -६०० वर रोल्स-रॉइस ट्रेंट ५०० प्रकारची इंजिने असतात. यांची क्षमता २६७ किलोन्यूटन आहे. -२०० व -३००ची बाह्य रचना एरबस ए-३३०सारखीच आहे तर -५०० आणि -६००ला ए३३०पेक्षा मोठे पंख असतात.