विकास बलवंत शुक्ल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकास बलवंत शुक्ल (जन्म : १० ऑगस्ट १९५८) हे महाराष्ट्रातल्या चाळीसगाव येथे राहणारे एक मराठी अनुवादक आहेत. त्यांनी गी द मोपासाँ याच्या कथांचे मराठी अनुवाद केले आहेत.

चाळीसगावच्या आनंदीबाई वेंकट हायस्कूलमधून १९७६ साली मॅट्रिक झाल्यावर विकास शुक्ल यांनी पुणे विद्यापीठातून १९७९मध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण केले. स्टेट बँक ऑफ इंडियात जानेवारी १९७९पासून ते मार्च २०००पर्यंत नोकरी करून ये निवृत्त झाले. चाळीसगावातल्या Anupam Computer & Internetचे ते मालक आहेत.

आकाशवाणीच्या जळगाव आणि औरंगाबाद केंद्रांसाठी शुक्ल यांनी विविध नभोनाट्ये लिहिली असून ती ध्वनिक्षेपित झाली आहेत. नाटके बसवणे व त्यांत अभिनय करणे, ट्रेकिंग करणे हे त्यांचे छंद आहेत. चाळीसगावच्या रोटरी क्लबचे ते ३०हून अधिक वर्षे सभासद आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय सदस्य असलेले विकास बलवंत शुक्ल यांचा जात पात, धर्म, पत्रिका, मुहूर्त अश्या सर्व जुनाट आणि अशास्त्रीय बाबीना कडाडून विरोध आहे. समाजाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी १९८६ साली आंतरधर्मीय विवाह केला.

विकास बलवंत शुक्ल यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • गॉडफादर (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - मारिया पुझो)
  • मोपासाँच्या सर्वश्रेष्ठ कथा, खंड १ व २ (अनुवादित, मूळ फ्रेंच लेखक -गी द मोपासाँ)
  • शय्यागृहात (अनुवादित, मूळ पुस्तक : 'इन द बेडरूम', लेखक - गी द मोपासाँ) (इ.स. २०००)