वालचंदनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वालचंदनगर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील वसवलेले गाव आहे. इंदापूर तालुक्यातील या गावाचा पिन क्र. ४१३ ११४ आहे.

वालचंदनगर हे बारामती – इंदापूर रस्त्यावरील 'जंक्शन' या गावापासून ६ किमी अंतरावर आहे.

जवळचे रेल्वे स्थानक ‘बारामती रेल्वे स्थानक’ आहे.

येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एस.टी.) बस सेवा उपलब्ध असून ३ बस थांबे आहेत: १. नवीन बस स्थानक, २. पोस्ट कॉलनी बस थांबा, ३. जुने बस स्थानक

येथे 'वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड' हा कारखाना आणि कारखान्यातील कामगार-अधिकारी यांसाठी वसाहत आहे.

इतर काही उपलब्ध सोयी-सुविधा:

बाजारपेठ, भाजीबाजार

प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयः वर्धमान विद्यालय (मराठी माध्यम), भारत चिल्ड्रेन्स ॲकॅडेमी (इंग्रजी माध्यम)

पोस्ट ऑफिस, पोलीस चौकी,

रुग्णालये, ग्रंथालय, मैदान, उद्यान