वार (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


HS Disambig.svg
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


वार (काल) - आठवड्यातील सात दिवसांपैकी एक दिवस. जसे रविवार, सोमवार इ.

वार (हल्ला)- लाठी, काठी, गदा, तलवार, खंजीर आदी हातात धरायच्या शस्त्राने दुसर्‍याला दिलेला तडाखा.

वार (माप) - तीन फुटाचे माप

वार (वारंवारता)- संख्याविशेषणाला वारंवारता दाखविण्यासाठी लावायचा एक प्रत्यय, जसे, एकवार, अनेकवार इ.

वार (पाळी) - वारी, पाळी, खेप. इ.

वार (गर्भाचे वेष्टन)- आईच्या पोटात असतानाचे गर्भाचे वेष्टन

वार (फारसी प्रत्यय) - ‘ने‘ या विभक्ती प्रत्ययाऐवजी किंवा, प्रमाणे वा अनुसार या शब्दयोगी अव्ययांऐवजी वार हा फारसी प्रत्यय मराठी नामांना लागतो. उदा० क्रमवार(=क्रमाने, क्रमाक्रमाने, अनुक्रमे); संगतवार(=योग्य क्रमाने); विगतवार=तपशीलवार(=सविस्तर, यथासांग With details, In detail); जातवार(=जातीप्रमाणे); नावनिशीवार(=नाव वगैरे सकट); उमेदवार(=उमेद असलेला, full of उमेद). पुढे ई लावल्यास भाववाचक नामे बनतात : जसे क्रमवारी, आणेवारी, उमेदवारी इ.

वार (आडनावाचा हिस्सा) - महाराष्ट्रातील काही लोकांच्या, विशेषतः तेलंगणातून विदर्भात आलेल्या लोकांच्या आडनावाचा अंत्य हिस्सा. उदा० अन्नमवार, कन्नमवार, चिद्रेवार, तालेवार, तुमपल्लीवार, नंदनवार. पारपिल्लेवार, बोजेवार, मुनगंटीवार, रुद्रवार, हमपल्लीवार वगैरे.