वारकरी (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चांदी पक्षी
वारकरी पक्षी
Fulica atra

वारकरी किंवी चांदी (इंग्लिश: Coot; हिंदी:आरी, खाराकुल, टीकारी; गुजराती:आड, दसाडी) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने लहान कोंबडीएवढा असतो. अंगाने लहानखुरी भुंडी असते. पाण्यात तरंगताना दुरून बद्कासारखा दिसतो. कपाळावर चांदीसारखा टिळा असतो. चोच हस्तीदंतासारखी पांढरी असते. ह्यावरून तिची ओळख पटते. पायाची बोटे कातडीने जोडलेली असतात. नर मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी थव्याने आढळून येतात.

वितरण[संपादन]

भारतीय उपखंड आणि श्रीलंकेत निवासी आणि जुलै – ऑगस्ट या काळात आढळतात.

निवासस्थाने[संपादन]

हे पक्षी दलदली आणि सरोवरे, झिलानी, आणि तळी या भागात आढळतात.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली