वाघनख
Appearance
वाघनख (मराठी नामभेद: वाघनखे, वाघनख्या) हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले मुठीत धरण्याजोगे शस्त्र आहे. याला वाघाच्या पंज्यावरील नखांप्रमाणे पोलादाची तीक्ष्ण नखे असतात व मूठ वळल्यावर ती पंजात लपवता येतात. हे ह्त्यार हातामधे धारण करून मूठ बंद केल्यावर बोटात दोन अंगठया (तर्जनी-करंगळी घालण्यासारखे दोन अंगठ्या/गोल) घातल्याप्रमाणे दिसते. त्या अंगठया आतील बाजूने एका धातूपट्टीने जोडलेल्या असून त्यावर तीक्ष्ण नखे लावलेली असतात. यांचा उपयोग लक्ष्यावर गुप्तपणे हल्ला चढवण्यासाठी प्रामुख्याने केला जाई.
ऐतिहासिक संदर्भ
[संपादन]वाघनखांचा वापर १० नोव्हेंबर, इ.स. १६५९ रोजी मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजीमहाराज यांनी आदिलशाही सेनानी अफजल खान यास जावळीच्या युद्धात ठार मारण्यासाठी केला होता, असे म्हणले जाते.
चित्रदालन
[संपादन]-
वाघनखांच्या संरचनेचे निरनिराळे नमुने
हे ही पहा
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |