वसंत लिमये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वसंत गोविंद लिमये (जन्म :नागाव, इ.स. १९२४; - ७ एप्रिल, २०१५) हे भारतीय स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट् चळवळ, अध्यापन, साहित्य, भटकंती, भाषांतर, छायाचित्रण अशा विधिध क्षेत्रांत मुशाफिरी करणारे एक मराठी व्यक्तिमत्त्व होते.

लिमये साडेचार वर्षांचे असतानाच त्यांचे वडील गेले. त्यांची आजी, उमाआजी मोठी खंबीर होती. किरकोळ पेन्शनच्या आधारे तिने  ३-४ मुलांचे संगोपन केले. त्यांना कडव्या स्वाभिमानाचे आणि स्वावलंबनाचे बाळकडू उमाआजीकडूनच मिळाले. लिमये यांचे शिक्षण अलिबाग, पुणे व मुंबई येथे झाले. १९४८ च्या सुमारास त्यांनी रुईया कॉलेजातून गणितात एम.एस्सी. केले.

राजकीय कारकीर्द[संपादन]

वसंत लिमये यांच्यावर तरुणपणी मार्क्सिस्ट विचारांचा पगडा होता. त्यांनी पुण्यातील एस.पी.कॉलॆजसमोर १९४२ सालच्या आंदोलनात लाठ्या खाल्या. त्यावेळी त्यांना डोक्यावर उजवीकडे अडीच इंचांची खोक पडली.



(अपूर्ण)