वल्लभपूरची दंतकथा
Appearance
वल्लभपूरची दंतकथा हे बादल सरकार यांनी लिहिलेल्या ‘बोल्लोवपुरेर रूपकथा’ या बंगाली नाटकाचे अमोल पालेकर यांनी केलेले मराठी रूपांतर आहे.
नावाजलेल्या इंग्रजी आणि हिंदी नाट्यकृती सादर करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या‘थिएटर युनिट’ या संस्थेतर्फे रंगमंचावर सादर केलेले 'वल्लभपूरची दंतकथा'
हे पहिले मराठी नाटक होते. हे नाटक अमोल पालेकर व सत्यदेव दुबे या दोघांनी मिळून दिग्दर्शित केले होते.
हे नाटक १९६९ साली महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत दाखल झाले आणि या नाट्यप्रयोगाला पहिले पारितोषिक मिळाले. दिग्दर्शनाचे पहिले पारितोषिक सत्यदेव दुबे आणि अमोल पालेकर या दोघांना मिळून, आणि वैयक्तिक अभिनयाची पारितोषिके एकनाथ हट्टंगडी व रेखा सबनीस यांना मिळाली.