वर्ग चर्चा:संगीत

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तिरपी मुद्राक्षरेनमस्कार. मी सदस्य:अभय आनंद भावे।अभय आनंद भावे. ही चर्चा इथे करावी किंवा नाही हे खरं तर माहिती नाही.मी कालपासूनच विकीपीडिया सदस्य झालो आहे. ही चर्चा अन्यत्र व्हायला हवी असेल तर कॄपया तसं सांगावं.

भारतीय शास्त्रीय संगीताचा माझा थोडाफार अभ्यास आहे. त्या विभागात योगदान द्यायला आवडेल. मला वाद्य या वर्गाच्या रचनेमध्ये काही मूलभूत बदल सुचवायचे आहेत. ते असे:

भारतीय वाद्यवर्गीकरण पद्धती ही खूपशी सुनिश्चित आहे. त्यात आपण ४ प्रमुख वर्ग पाहू शकता. या वर्गांचे टॅग्ज मी शक्य तितक्या वाद्यांच्या लेखांना लावतो आहेच, पण त्यामुळे ते वाद्य वाद्ये या वर्गातही दिसत राहतंच, आणि लॉजिकली ते फार चूक आहे, असंही नाही.

परंतु अनेक वाद्ये ही थेट वाद्ये या वर्गाचे उपवर्ग म्हणून लिहिली गेली आहेत. त्याऎवजी ती वर्गीकरणपद्धतीनुसार त्या त्या वर्गांत ठेवली जावीत, असं मला वाटतं.

उदाहरणार्थ तबला हा वाद्ये चा एक उपवर्ग आहे, जो अवनद्ध वाद्ये या वर्गाचा एक उपवर्ग असला तर अधिक योग्य राहील असं मला वाटतं.

परंतु मी ते स्वतः लगेच करणं टाळलं, कारण वाद्ये या वर्गातून मग तबला थेट दिसणार नाही, आणि गैरसमज होऊ शकतील.

मार्गदर्शन मिळावे.

धन्यवाद. अभय आनंद भावे १२:४३, ९ जानेवारी २०१२ (UTC)

अभय, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत! आपले विधान १००% बरोबर आहे. वाद्ये हा फारच ठोबळ वर्ग आहे व त्यात अनेक उपवर्ग हवेत. हे उपवर्ग वाद्ये ह्या वर्गाचा भाग असतीलच त्यामुळे व्याद्यांबद्दलचे सर्व लेख वाद्ये ह्याच वर्गात दिसायला हवेत हा अट्टाहास करणे चुकीचे ठरेल.
अशा प्रकारचे ठोबळ वर्गीकरण येथे आपणास अनेक विषयांमध्ये आढळेल. उदा. वर्ग:भाषा ह्या वर्गात जगातील सर्व भाषा, तसेच वर्ग:देश ह्या वर्गात सर्व देशांची यादी इत्यादी. हे बदलून उपवर्ग निर्माण करणे सुटसुटीत व योग्य ठरेल. - अभिजीत साठे १३:१३, ९ जानेवारी २०१२ (UTC)

वर्गीकरण[संपादन]

सहाय्य:वर्ग येथे वर्गीकरणाविषयी अधिक मदत उपलब्ध आहे. त्यातील "वर्गीकरणाचे संकेत" येथे लिहिलेल्या #२ अनुसार चपखल वर्गीकरण श्रेयस्कर मानले जाते. अर्थात काही वेळा तसे वर्ग उपलब्ध नसल्यास लेख तात्पुरते संबंधित ढोबळ वर्गांत टाकायला हरकत नसते.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १४:५६, ९ जानेवारी २०१२ (UTC)