भारतीय वाद्यवर्गीकरण पद्धती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये वाद्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रथम स्पष्ट प्रयत्न भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथात आढळतो. वाद्याच्या ध्वनी उत्पन्न करण्याच्या तंत्रानुसार त्यांनी पुढीलप्रमाणे वर्गीकरण केले आहे.

  1. सुषिर वाद्ये  : हवेच्या प्रवाहाचा वापर करून ध्वनी उत्पन्न करणारी वाद्ये
    • बासरी
    • सनई
    • संवादिनी (हार्मोनियम)
    • इत्यादि
  1. तत वाद्ये : तंतूंच्या कंपनातून ध्वनिनिर्मिती करणारी वाद्ये
    • सतार
    • सारंगी
    • व्हायोलिन
    • इत्यादि
  1. घन वाद्ये : वाद्याच्या पॄष्ठभागावर आघात करून ध्वनी निर्माण करणारी वाद्ये
    • घंटा
    • झांज
    • चायना ब्लॉक
    • इत्यादि
  1. अवनद्ध वाद्ये : मढवलेली वाद्ये
    • तबला
    • मॄदंग
    • ड्रम
    • इत्यादि