ल्येव तल्स्तोय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
ल्येव तल्स्तोय
Ilya Efimovich Repin (1844-1930) - Portrait of Leo Tolstoy (1887).jpg
इल्या रेपिन याने रंगविलेले टॉल्स्टॉयचे व्यक्तिचित्र (१८८७)
पूर्ण नाव ल्येव्ह निकोलायविच तल्स्तोय
जन्म ऑगस्ट २८, १८२८
यास्नाया पोल्याना, रशिया
मृत्यू नोव्हेंबर २०, १९१०
अस्तापोव्हो, रशिया
कार्यक्षेत्र कादंबरीकार, नाटककार
राष्ट्रीयत्व रशियन Flag of Russia.svg
साहित्यप्रकार कादंबरी, नाटक
प्रसिद्ध साहित्यकृती वॉर अँड पीस, आना कारेनिना
प्रभावित महात्मा गांधी, मार्टिन ल्यूथर किंग, ज्युनियर
स्वाक्षरी Leo Tolstoy signature.svg

काउंट ल्येव निकोलायविच तल्स्तोय (मराठी लेखनभेद: लिओ टॉल्स्टॉय ; रशियन: Лев Николаевич Толстой ; ) (सप्टेंबर ९, १८२८ - नोव्हेंबर २०, १९१०) हा रशियन लेखक, कादंबरीकार, नाटककार, तत्त्वज्ञ, शांततावादी ख्रिश्चन अराजकवादी आणि शिक्षणसुधारक होता. रशियन इतिहासातील तल्स्तोय उमराव घराण्यातील व्यक्तींमध्ये तो सर्वात प्रभावशाली असावा.

दर्जेदार कादंबरीलेखनामुळे, विशेषकरून वॉर अँड पीस आणि आना कारेनिना या दोन अप्रतिम साहित्यकृतींमुळे तल्स्तोय महान साहित्यिक मानला जातो. या दोन्ही कादंबऱ्या आजतागायत सर्वोत्तम व वास्तववादी ललित साहित्याचा उच्च बिंदू मानल्या जातात. तल्स्तोय हा त्याच्या गुंतागुंतीच्या व विरोधाभासी सभावासाठीही तितकाच परिचित आहे. १९७० नंतर त्याची मते आदर्शवादी व निराकारी बनली आणि तो समाज प्रवर्तक गणला जाऊ लागला. त्याची किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू या लिखाणातून मांडलेल्या अहिंसक लढ्याबद्दलच्या संकल्पनेचा २०व्या शतकातील मोहनदास गांधीमार्टीन लुथर किंग या थोर व्यक्तींवर प्रचंड प्रभाव पडला.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: