लैंगिकता
लैंगिकता म्हणजे शारीरिक, भावनिक, बौदिक् व सामाजिक पैलूंच्या पौरुषी व स्त्रीत्वाच्ं त्या व्यक्तीचं प्रकटीकरण.
लैंगिकतेचे पैलू
[संपादन]लैंगिकतेचे तीन महत्त्वाचे पैलू आहेत. ते पुढीलप्रमाणे
शारीरिक घडण
[संपादन]जन्माला आलेल्या बाळाचे लिंग बघून तो मुलगा आहे का मुलगी आहे हे ठरवले जाते. वृषण व शिश्न असेल तर बाळ मुलगा आहे व मायांग असेल तर ती मुलगी आहे हे मानले जाते. काही वेळा अशी बाळं जन्माला येतात ज्यांना पुरुष व स्त्री या दोघांची काही अंशी विकसित जननेंद्रिये दिसतात. अशा व्यक्तींना द्विलिंगी म्हणतात. द्विलिंगी या शब्दाला इंग्रजीत इंटरसेक्स असा शब्द आहे.
लिंग भाव
[संपादन]लिंग भाव म्हणजे स्वतःची पुरुष किंवा स्त्री म्हणून ओळख. तुम्ही जग पुरुष म्हणून अनुभवता की स्त्री म्हणून अनुभवता तो तुमचा लिंग भाव असतो. बहुतांशी व्यक्तींमध्ये शरीराचे लिंग व लिंग भाव सलग्न असतो. म्हणजे शरीर पुरुषाचे असले तर लिंग भाव पुरुषाचा असतो व शरीर स्त्रीचे असले तर लिंग भाव स्त्रीचा असतो. या अशा संलग्नतेला इंग्रजीमध्ये सिसजेंडर असे म्हणतात.
काही व्यक्तींमध्ये शरीराचे लिंग व लिंग भाव संलग्न नसतो. म्हणजे शरीर पुरुषाचे असते तर लिंग भाव स्त्रीचा असतो. तर काही व्यक्तींमध्ये शरीर स्त्रीचे असते व लिंग भाव पुरुषाचा असतो. एका व्यक्तीमध्ये शरीर व लिंग भाव वेग-वेगळा असण्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सजेंडर असे म्हणतात.
काही व्यक्तींमध्ये लिंग भाव स्थिर स्थितीत दीर्घ काळ पुरुषाचा किंवा स्त्रीचा नसतो. यांच्यात लिंग भाव अधून मधून बदलत रहातो. अशाला इंग्रजीमध्ये पॅनजेंडर असे म्हणतात. याला इंग्रजीमध्ये नॉनबायनरी जेंडर असेही म्हणतात.
लैंगिक कल
[संपादन]वयात आल्यावर आपल्याला दीर्घ काळ पुरुषांबद्दल का स्त्रियांबद्दल लैंगिक आकर्षण वाटते तो आपला लैंगिक कल असतो. याचे चार प्रकार असतात.
विषमलिंगी लैंगिक कल
[संपादन]अशा व्यक्तींना वयात आल्यावर फक्त विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींबद्दलच लैंगिक आकर्षण वाटते. म्हणजे पुरुषांना फक्त स्त्रियांबद्दलच लैंगिक आकर्षण वाटते व स्त्रियांना फक्त पुरुषांबद्दलच लैंगिक आकर्षण वाटते. याला इंग्रजीमध्ये हेटेरोसेक्शुअल असे म्हणतात.
उभयलिंगी लैंगिक कल
[संपादन]अशा व्यक्तींना वयात आल्यावर दोन्हीलिंगाच्या व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटते. म्हणजे पुरुषांना स्त्रियांबद्दल व पुरुषांबद्दल लैंगिक आकर्षण वाटते व स्त्रीयांना पुरुषांनाबद्दल व स्त्रियांबद्दल लैंगिक आकर्षण वाटते. याला इंग्रजीमध्ये बायसेक्शुअल असे म्हणतात.
समलिंगी लैंगिक कल
[संपादन]अशा व्यक्तींना वयात आल्यावर फक्त आपल्याच लिंगाच्या व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटते. म्हणजे पुरुषांना फक्त पुरुषांबद्दलच लैंगिक आकर्षण वाटते व स्त्रियांना फक्त स्त्रियांबद्दलच लैंगिक आकर्षण वाटते. याला इंग्रजीमध्ये गे किंवा समलैंगिकता असे म्हणतात.[१]
अलैंगिकता
[संपादन]अशा व्यक्तींना वयात आल्यावर दीर्घ काळ (कोणतीही शारीरिक समस्या नसताना) पुरुषांबद्दल किंवा स्त्रियांबद्दल लैंगिक आकर्षण वाटत नाही. असेक्शुअल हा इंग्रजी शब्द आहे.
स्त्रीवादात लैंगिकता
[संपादन]स्त्रीवादात लैंगिकता ही संज्ञा वेगवेगळ्या विचारपद्धतीने बघितली जाते. जहाल स्त्रीवादी स्त्रियांच्या समाजात आणि प्रसारमाध्यमात होणाऱ्या लैंगिक वस्तुकरणाकडे आणि लैंगिक शोषणाकडे समीक्षात्मक दृष्टिकोनातून पाहतात. त्या वेश्याव्यवसाय आणि सेक्स वर्क याचा विरोध करतात. इतर स्त्रीवादी लैंगिकतेबद्दल बोलताना पुनरुत्पादन, बलात्कार, घरगुती हिंसाचार, स्त्रियांच्या शरीरावर होणारे जातीय आणि धार्मिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ या विषयी बोलतात.
लैंगिकतेत नैसर्गिकता तथा खुलेपणा
[संपादन]"सेक्स ही नैसर्गिक गरज आहे माणसाची!” हे खुलेपणाने मान्य न करण्याची सर्वात मोठी चूक आपण करतो. त्यामुळेच निरनिराळ्या समस्या तयार होतात. काही तरी गूढ अनैसर्गिक असं काहीतरी स्वरूप या सेक्सला आपण दिलं आहे. सेक्सविषयी खुलेपणाने काहीही बोललं जात नाही अथवा विचारलं जात नाही, तो सभ्यपणा नाही, असा एक गोड समज समाजाने आपल्याला करून दिला आहे आणि तोच आपण पुढच्या पिढीला देत आहोत. या समजामुळेच अनेक प्रश्न विचारण्याचं त्यांचं स्वातंत्र्यच आपण हिरावून घेतले आहे. त्यातून अनेक गैरसमजांचा जन्म झाला आहे. चार वर्षांची मुलगी शारीरिक दृष्टिने संबंधांसाठी अपरिपक्व असते, हे समजण्यासाठी डॉक्टर असण्याची गरज नाही; पण, तरीही अशा मुलीवर बलात्कार होतात. काय शोधत असेल हा बलात्कार करणारा? या प्रश्नाचा पाठपुरावा केला की आपल्या लक्षात येतं की लहान वयातील मुलींबरोबर लैंगिक संबंध ठेवले की लैंगिक शक्ती वाढते, असा खुळचट गैरसमज काही लोकांमध्ये आहे. आणि तो नसला तरी विकृत वासना त्यामागे असतेच. त्याची परिणती पुढे अशा गुन्ह्यात होते.
संदर्भ
[संपादन]- ^ Khire, Bindumadhav (2008). Indradhanu: Samalaingikateche Vividh Ranga (हिंदी भाषेत). Bindumadhav Khire.