लेयटे आखात
Appearance
हा लेख लेयटे आखात याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, लेयटे आखाताची लढाई.
लेयटे आखात हा फिलिपाईन समुद्राचा एक भाग आहे. फिलिपाईन्सच्या लेयटे बेटाच्या पूर्वेस असलेल्या या आखाताच्या उत्तरेस समार द्वीप तर दक्षिणेस मिंडनाओ द्वीप आहेत. पूर्वेस हा आखात पॅसिफिक समुद्रास जोडलेला आहे.[१][२] याच्या आग्नेयेस दिनागात बेट तर पूर्वेकडे होमोनहोन बेट आणि सुलुआन बेट आहेत. याची साधारण पूर्व-पश्चिम असलेल्या या आखाताची रुंदी अंदाजे १३० किमी तर लांबी ६० किमी आहेत.[२]