लेथ
Jump to navigation
Jump to search
लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो. लाकडी कामासाठी वेगळ्या लेथ यंत्राचा वापर करतात. ज्या वस्तूवर काम करायचे आहे त्याला जॉब असे म्हणतात अन ज्याने काम करायचे आहे त्याला टूल' म्हणतात. जॉब वर्तुळाकार फिरत असतो तर टूल स्थिर असते. लेथ मशीनवर खालील कामे केली जातात.
ॲटोमॅटीक लेथ,CNC लेथ,टरेट लेथ, बेंच लेथ, इंजिन लेथ अशा प्रकारच्या काही लेथ मशीन्स.
- फेसिंग करणे :-दंडगोलाची लांबी कमी करणे.
- टर्निंग :-दंडगोलाचा व्यास कमी करणे.
- थ्रेडिंग :-आट्या पाडणे.
- ड्रिलिंग :- छिद्र पाडणे.
- बोरिंग/कौंटर बोरिंग:-असमान व्यासाचे छिद्र
- चाम्परिंग :-धारदार/कोनेदार बाजूला सपाट/निमुळते करणे.
- नर्लिंग :-एखादी वस्तू पकडण्यासाठी/पक्कड (ग्रीप)मजबूत होण्यासाठी तयार केलेला आकार.
- टेपरींग :- दंडगोल निमुळता करणे.
लेथ मशिनच्या काही भागांची नावे.
- हेड स्टॉक
- टेल स्टॉक
- टुल पोस्ट
- कम्पाउंड रेस्ट
- बेड
- कॅरेज