Jump to content

लेक लाडकी अभियान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेक लाडकी अभियान हे दलित विकास महिला मंडळ या सातारा येथील संस्थेने २००४ साली सुरू केलेले अभियान आहे. गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीचे महत्त्वपूर्ण काम केलेले आहे. मुलींची संख्या कमी झाली आहे. गर्भामध्ये त्यांना दुजाभावाने वागवले जाऊ नये, त्या केवळ मुली आहेत म्हणून त्यांना गायब करू नये म्हणून स्टिंग ऑपरेशन करून गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांना रंगेहाथ पकडून आणि गुन्हा दाखल केला जातो. यामुळे या कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी लेक लाडकी हे प्रभावी अभियान ठरले आहे. जागतिक महिला दिनी समस्त जगातील महिलांचा समतेसाठी कटीबद्ध राहून काम करण्याचा निर्धार अभियानाने केला आहे.[]

गर्भधारणा पूर्व आणि प्रसव पूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा १९९४ सुधारित २००३ अंतर्गत लेक लाडकी अभियानाने २००४ पासून २०१९ पर्यंत ५० पन्नास वेळा बनावट गिराईक बनवून गरोदर मातेला गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांकडे पाठवून गर्भलिंग निदान करताना डॉक्टरना रंगेहाथ पकडले. ५० पैकी १८ प्रकरणांमध्ये डॉक्टरना शिक्षा लागली. हजारो मुली लेक लाडकी अभियानाने वाचवल्या म्हणून लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक वर्षा देशपांडे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मानाचा समजला जाणारा  पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते दोन ऑक्टोबरला बाबापू पुरस्कार, इंडिया टीव्हीच्या वतीने ब्रेवरी अवॉर्ड, ग्रेट वुमन, सावित्रीबाई फुले पुरस्कार धनंजय थोरात पुरस्कार, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या हस्ते धाडसी महिला पुरस्कार, स्वयंसिद्धा पुरस्कार, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश हेमंत गोखले यांच्या हस्ते सन्मानित केले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Dalit Mahila Vikas Mandal – DMVM". http://dmvm.in/ (इंग्रजी भाषेत). 2019-03-10 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)