Jump to content

अंतर्गळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)
अंतर्गळ असलेल्या रुग्णाचे छायाचित्र

अंतर्गळ (लॅटिन, स्पॅनिश, पोर्तुगीज, इंग्रजी: Hernia, जर्मन, फ्रेंच: Hernie) शरीरातील ऊती, इंद्रिय किंवा इंद्रियाचा भाग शरीरपोकळीतून बाहेर येण्याच्या स्थितीस अंतर्गळ असे म्हणले जाते. यास हर्निया असे म्हणतात. साधारणतः हे पोटाच्या भागात आढळून येते. हे जन्मजात किंवा नंतर उद्भवलेले असू शकते. अनेक कारणांमुळे हे उद्भवू शकते, परंतु जड वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलणे, एखादा खड्डा उडी मारून पार करणे व अनुवांशिकता ही या व्याधीची मुख्य कारणे असतात.

अंतर्गळामुळे रोग्याला वेदना होऊ शकतात. त्याच्या पोटाला बाहेरून स्पर्श केल्यास अंतर्गळ हा पोटातील एखादा गोळा असल्यासारखे जाणवते..

लहान मुलांमध्ये जन्मतः अंतर्गळ असण्याचे प्रमाण सुद्धा जास्त असते कारण आईच्या गर्भात असतांना जांघेत एक प्रकारची पोकळी असते ज्या पोकळीतून अंडाशय खाली उतरत असते परंतु ती पोकळी ही बाळ जन्माला येण्याआधी बंद होत असते. जर ती पोकळी बंद नाही झाली तर त्या जागेवर अंतर्गळ होण्याची शक्यता असते. जांघेमध्ये असलेल्या या हर्नियाला इंग्वायनल हर्निया असे म्हणतात.

संदर्भ

[संपादन]
  • मराठी विश्वकोश : भाग १