ली वून-जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोलरक्षण करताना ली वून-जी

ली वून-जी (कोरियन: 이운재 ; रोमन लिपी: Lee Woon-Jae ;) (एप्रिल २६, इ.स. १९७३ - हयात) हा दक्षिण कोरियाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरुष फुटबॉल खेळाडू आहे. तो संघातील गोलरक्षकाची भूमिका बजावतो. दक्षिण कोरियातील के-लीग या फुटबॉल साखळी स्पर्धेत तो चुन्नाम ड्रॅगन संघातर्फे खेळतो. इ.स. १९९४, इ.स. २००२, इ.स. २००६ व इ.स. २०१० सालांतील फिफा विश्वकरंडक स्पर्धांमध्ये त्याने दक्षिण कोरियाचे प्रतिनिधित्व केले.

बाह्य दुवे[संपादन]