Jump to content

लीलावतीच्या लेकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


भारतात स्त्री-शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या आद्यशिक्षिका सावित्रीबाई ज्योतिराव फुले आणि त्यांच्यामुळे आज विविध क्षेत्रात शिकणाऱ्या, नोकरी करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना "सावित्रीच्या लेकी " म्हणून संबोध ले  जाते. तसेच, या क्रांतिज्योतीमुळे शिकलेल्या लेकी विविध क्षेत्रात मूलभूत , भरीव संशोधन पण करत आहेत, या लिलावतीच्या लेकी ! लीलावती ही १२ व्य शतकातील थोर गणिती, खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य यांची लेक. ती सुद्धा गणितात निष्णात होती .


सर्वसाधारणपणे असे गृहीत धरले जाते  की , स्त्रियाची बुद्धी विज्ञान, गणित आणि तर्कशास्त्र यात कल्पक नसते . परंतु ह्या गृहीतकाला  छेद देणाऱ्या बऱ्याच लिलावतीच्या लेकी भारतात होऊन गेल्या आहेत आणि अजूनही नवे नवे प्रांत आपल्या संशोधनाने सर करीत आहेत .


स्त्रिया आपल्या उपजतच असणाऱ्या तर्कशास्त्रीय ज्ञानाने अगदी पुरातन काळापासून भरीव योगदान देत आहेत. प्रश्न आहे तो केवळ त्यांना योग्य संधी मिळण्याचा ! लीलावती पासून , गार्गी  , मैत्रेयी ते थेट आजच्या आधुनिक काळातील चांद्रयान मोहिमेतील महिला शास्त्रज्ञांपर्यंत या लिलावतीच्या लेकीचं लीलया वावर सर्व प्रांतात आहे!


संशोधन करताना या महिलांना , बऱ्याच सामाजिक , सांस्कृतिक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले . या बाबतीत एक महत्त्वपूर्ण किस्सा असा,  भारतातील विज्ञान विषयातील डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या स्त्री डॉ कमला भागवत-सोहनी यांना , इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स  , बंगलोर या प्रख्यात संस्थेतही प्रवेश मिळविण्यासाठी झगडावे लागले होते ! भारतातील पहिले नोबेल पारितोषिक मिळवणारे डॉ सी व्ही रमण , हे तेव्हा या संस्थेचे संचालक होते . महिला या संशोधन करण्यासाठी सक्षम नसतात , हे कारण सांगून त्यांनी चक्क कमल सोहनी याना प्रवेश नाकारला ! परंतु कमल सोहनी यांनी त्यांच्या कक्षाबाहेर सत्याग्रह केला मग डॉ सी व्ही रमण यांनी तीन अटींवर त्यांना प्रवेश दिला .त्या अटी अशा - कमल सोहनी या नियमित विद्यार्थी नसतील, त्या शिकाऊ विद्यार्थी असतील , त्यांना प्रयौगशाळेत रात्री उशिरापर्यंत काम करावे लागेल , आणि तिसरी अट अशी कि , त्यांनी आपल्या वागणुकीतून प्रयोगशाळेतील वातावरण बिघडवू नये ( म्हणजे, प्रयोगशाळेतील पुरुष विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करू नये .!!) अशा कठीण परिस्थितीतही कमल सोहनी यांनी चिकाटीने, झोकून देऊन आपले शिक्षण व संशोधन पूर्ण केले . त्यांची निष्ठा , बुद्धिमत्ता बघून  नंतर डॉ सी व्ही रमण  देखील प्रभावित झाले. डॉ कमल सोहनी यांनी नुसती डॉक्टरेट नाही मिळवली , तर पुढे अनेक महिला संशोधकांचा प्रवेश मिळविण्याचा मार्गही मोकळा केला !


डॉ जानकी अंमल , डॉ असीमा चॅटर्जी , दर्शन रंगनाथन , इरावती कर्वे, बी विजयालक्ष्मी , अण्णा मणी , रमा गोविंदराजं , डॉ आनंदीबाई जोशी , कमल रणदिवे इथपासून ते आजच्या मिसाईल वूमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेसी थॉमस , ते मंगळयान चांद्रयान या महत्त्वाकांक्षी मोहिमेची धुरा पेलणाऱ्या रितू करीधलं , डॉ एम वनिता पर्यंत अनेक ज्ञात -अज्ञात महिला संशोधक या लिलावतीच्या लेकी आहेत ! डॉ. आदिती पंत , डॉ. रजनी भिसें, डॉ. चंदा जोग, डॉ. मेधा खोलें, यांसारखी अनेक नवे आहेत. परंतु भारतीय स्त्री वैज्ञानिकांची नवे दुर्दैवाने जास्त कोणाला परिचयाची नाहीत. कल्पना चावला, सुनीता विलियम्स या भारतीय वंशाच्या पण , परदेशी  नावांशिवाय तिसरे महिला वैज्ञानिकांची नवे आजच्या पिढीला माहित नाहीत. त्यांनी सर्व अडथळे पार करीत आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विविध क्षेत्रात अनमोल असे संशोधन केले आहे, करीत आहेत . एक मुलगी शिकली तर ती घरादाराला शिकविते असे म्हणतात , त्याप्रमाणेच महिला जर संशोधन क्षेत्रात आपले योगदान देत असतील तर त्या पृथ्वी, पर्यावरण , आणि संपूर्ण समाजासाठी उपयोगी असे कार्य करते . शेती, हवामान, रसायन, अवकाश, औषधं, पर्यावरण, हवामान, सागरी जीवन, पाणी, ऊर्ज अशा  अनेक क्षेत्रांमध्ये नवनवी आव्हानं समोर उभी राहताहेत. आणि या साऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय स्त्रियादेखील अत्यंत सक्षम आहेत. भारतीय मुलींना संशोधनाकडे वळण्यासाठी त्यांना सर्व स्तरावर  प्रोत्साहन जर दिले , तर  आज आपल्या देशाला विज्ञानाच्या संशोधनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या  कल्पक विचारांच्या तरुण पिढीची नितांत गरज आहे, ती पूर्ण होण्यास मोठी मदत होईल. विज्ञान , ज्ञान हे कोणाही एका व्यक्ती, लिंग, वर्ण, जात, धर्म यांची मक्तेदारी नसून ते सर्वसमावेशक आहे असावयास हवे व अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी  त्याच उपयोग व्हावा , हीच कामना . त्यासाठी या सर्व लिलावतीच्या लेकींना , त्यांच्या कार्याला सलाम !