Jump to content

लिनक्स पॅकेजेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लिनक्स अनेक वितरणांमध्ये येते. ही वितरणे मुख्यता दोन प्रकारच्या पॅकेज "RPM" आणि "डेबियन्स (DEBIANS)" वापरते.


RPM:
RPM हे RedHat Package Managerचे संक्षिप्त नाव आहे. या पॅकेजला ".rpm" हे शेपूट असते. या पॅकेजचा उपयोग करणारे दोन मॊठे लिनक्स वितरण रेडहॅट लिनक्स आणि फ़ेडोरा (सार्वजनिक प्रकल्प) आहेत.

RPM करिता कमांड्स:
rpm –ivh : पॅकेज इंस्टाल करण्यासाठी.
rpm –e : पॅकेज अनइंस्टाल करण्यासाठी.
rpm –Uvh : पॅकेज अद्ययावत करण्यासाठी.
rpm –q : पॅकेज इंस्टाल्ड आहे का ते तपासण्यासाठी.
rpm –qa : इंस्टाल्ड पॅकेजच्या सुचीकरिता.

डेबियन (DEBIAN):
डेबियन पॅकेज हे सुसे लिनक्स आणि नॉपिक्स (Knoppix) या वितरणांअम्ध्ये उपयोगात आणल्या जाते. या पॅकेजचा हा फ़ायदा आहे की हे सॉफ़्टवेअर अवलंबित्व आपोआप ठीक करू शकते. या पॅकेजला ".deb" हे शेपूट असते.

डेबियन :
dpkg -install : पॅकेज इंस्टाल करण्यासाठी.
dpkg –r : पॅकेज अनइंस्टाल करण्यासाठी.
dpkg -l : इंस्टाल्ड पॅकेजच्या सुचीकरिता

सोर्स पॅकेजसs:
लिनक्समध्ये सॉफ़्टवेअर सोर्स कोडपासून देखील इंस्टाल करु शकतात. हे ज्यांना सॉफ़्टवेअरला काही बदल करायचे असते अशा सॉफ़्टवेअर विकासकर्त्याला आणि अनुभवी उपयोगकर्त्यांना उपयोगी ठरते.सर्वसाधारणपणे सोर्स कोड हे बंधिस्त प्रकारात असते.

लिनक्समध्ये ‘.tar’, ‘.tar.gz’, ‘.bz2’ प्रकारचे पॅकेज असतात. आपणाला सॉफ़्टवेअर इंस्टाल करण्यासाठी या पॅकेजमधून फ़ाईल्स बाहेर काढून त्या सोर्स फ़ाईल्स compile करावे लागते.

सोर्स फ़ाईलमधून इंस्टाल करण्याच्या कमांड्स:
./configure : हे संरचना फ़ाईल बनविते.
make : हे सोर्स फ़ाईल्सला compile करते.
make install : हे सॉफ़्टवेअर इंस्टाल करते.