लिंक्डइन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


लिंक्डइन हे एक वेब पोर्टल असुन वाणिज्य क्षेत्र, उद्योगधंद्यांमधील व्यावसायिक भेटीगाठींयासाठी ते प्रामुख्याने ओळखले जाते. या संकेतस्थळाचा शोध २८ डिसेंबर २००२ रोजी लागला [१] आणि ५ मे २००३ रोजी सर्वांसाठी उपलब्ध झाले. [२] फेसबुकवर ज्याप्रमाणे मित्रांचीची यादी असते तीच यादी लिंक्डइन येथे देखील असते त्याला कनेक्शन्स असे संबोधले जाते. इतर सोशल नेटववर्किंग साईट प्रमाणे यात देखील व्हिडीओ शेअरिंग, फोटो शेअरिंग, म्युझिक शेअरिंग, ब्लॉगिंग, मायक्रोब्लॉगिंग अश्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र फक्त व्यावसायिक जनसंपर्क तसंच भेटीगाठींसाठी वापर केली जाणारी असणारी लिंक्डइन ही एकमात्र वेबसाइट आहे. व्यावसायिक जगतात लिंक्डइन ह्य़ा वेबसाइटवर माहिती अद्ययावत असणे महत्त्वाचे ठरते. एप्रिल २०१७ मधील माहितीप्रमाणे लिंक्डइनचे ५०० मिलिअन वापरकर्ते आहेत, ज्यातील १६० मिलिअन सदस्य हे रोज लिंक्डइनचा वापर करतात.

लिंक्डइन प्रोफाइल[संपादन]

लिंक्डइनवरची प्रोफाइल म्हणजे एक व्यावसायिक रेझ्युमे किंवा बायोडेटा मानला जातो. लिंक्डइनवरची प्रोफाइलचा उद्देश म्हणजे नोकरी किंवा उद्योगसाठीचा संपर्क वाढवणे त्यातून रोजगारप्राप्ती करणे, नफा मिळवणे. त्यामुळे वापरकर्त्याला शैक्षणिक आणि व्यावसायिक माहिती इथे अद्ययावत ठेवणे गरजेचे असते. छंद, सिनेमे, संगीत वगैरेला लिंक्डइनवर विशेष महत्त्व दिले जात नाही, प्रोफाइल तयार करत असताना येथे चालू आणि पूर्वीची नोकरी, जॉब टायटल, कंपनी, क्षेत्र, तारखा आणि नोकरीविषयीची थोडक्यात माहिती भरावी लागते. तसंच एखाद्या संकेतस्थळाशी वापरकर्ता संबंधित असेल तर त्या संकेतस्थळाची माहिती (लिंक) ही या प्रोफाइलमध्ये देता येते. इतर सोशल नेटवर्किंग साइट्सप्रमाणेच प्रोफाइल फोटो ठेवण्याची सोयही लिंक्डइनवर आहे.

कनेक्शन्स[संपादन]

युजरने पाठवलेल्या कनेक्शन रिक्वेस्टला समोरच्या व्यक्तीने होकार दिला असता डायरेक्ट कनेक्शन तयार होतं. लिंक्डइनच्या भाषेत अशा संपर्काला वन डिग्री अवे कनेक्शन असे संबोधले जाते. फेसबुकवर जशी फ्रेंड रिक्वेस्ट असते तशी लिंक्डइनवर कनेक्शन रिक्वेस्ट असते, या प्रकारे तयार होणाऱ्या कनेक्शन्सना वापरकर्त्याला थेट ईमेल पाठवता येऊ शकतो. लिंक्डइनमद्धे डायरेक्ट कनेक्शनचे जे कनेक्शन्स आहेत (म्हणजे मित्रांचे मित्र) त्यांना टू डिग्री अवे कनेक्शन असे संबोधले जाते. आणि त्यांचे जे कनेक्शन्स आहेत (म्हणजे मित्रांच्या मित्रांचे मित्र) त्यांना थ्रीडिग्री अवे कनेक्शन असे म्हणले जाते, मात्र युझरला वन डिग्री अवे व्यतिरिक्त इतरांना थेट ईमेल पाठवता येत नाही. त्यासाठी पैसे देऊन घेता येणारे खास लिंक्डइन टूल्स आहेत. ज्याला इन्ट्रॉडक्शन्स, इनमेल आणि ओपनमेल (ओपनलिंक) असे म्हणले जाते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Linkedin: A Short Historical Review". 2018-11-02 रोजी पाहिले.
  2. ^ "About LinkedIn". press.linkedin.com (इंग्रजी भाषेत). 2018-11-02 रोजी पाहिले.