Jump to content

लाल केळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लाल केळीचे उत्पादन या पानावरून पुनर्निर्देशित)
तमिळनाडूतील लाल केळी

लाल केळी म्हणजे लालसर-जांभळी साल असलेल्या केळी होत. साधारण केळ्यापेक्षा ही थोडी आकाराने लहान असतात. पिकल्यावर याचे सालांचा रंग फिकट गुलाबी होतो. ती इतर पिवळ्या रंगाच्या केळीपेक्षा जास्त मृदू व गोड असतात. याचे उत्पादन पूर्व आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिकायूएई आदी देशात होते. मध्य अमेरिकेत याचे जास्त प्रचलन आहे पण तसेच ही केळी जगभर कोठेही मिळतात.

लाल केळीचे भारतातील उत्पादक राज्ये

[संपादन]

आजपर्यंत हिरवी आणि पिवळी केळी आपण पहिली आहे, आता लाल केळीचं उत्पादनही आपल्या राज्यातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर घेण्यास सुरुवात झाली आहे. लाल केळी दक्षिण भारतात मुख्यत्वे केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात लाल केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. देशभरातील बाजारात लाल केळीला मागणीही प्रचंड असते. आता महाराष्ट्रात देखील लाल केळीच उत्पन्न घेता येणार आहे.