लाच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आपले (सहसा बेकायदेशीर) काम तत्परतेने करून देण्यासाठी राजाला, अधिकार्‍याला किंवा अन्य कर्मचार्‍याला कामापूर्वी दिलेल्या बक्षिसीस लाच म्हणतात. ही लाच अनेकदा पैशाच्या स्वरूपात असते. लाच देणे-घेणे हा गुन्हा समजला जातो आणि अशा कृत्याला भ्रष्टाचार म्हणतात.

प्रतिबंध[संपादन]

लाच देण्यासाठी तयार ठेवलेल्या खुणा केलेल्या नोटांना पावडर लावून नोटांवर लाचखोर माणसाचे ठसे उमटवतात, आणि त्याआधारे त्याला पकडतात. हल्ली लाच देतानाचे छुपे चित्रण करून गुन्हेगाराला पकडण्याचे तंत्र विकसित झाले आहे.

लाच व बोटांचे ठसे यांवरील पुस्तके[संपादन]

  • लाच मागणीची तक्रार कोठे व कशी करावी? (लेखक -- श्री.श्री. जोशी-निलंगेकर)
  • बोटांचे ठसे आणि गुन्हेगाराचा शोध (लेखक -- श्री.श्री. जोशी-निलंगेकर)