लहूगड
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
लहुगड नांद्रा
छत्रपती संभाजी नगरहून सिल्लोडला जाताना १५ किलोमीटरवर चौका गाव लागते. तेथून डाव्या बाजूच्या रस्त्याने १८ किलोमीटरवर लहुगड नांद्रा आहे. किंवा जालना मधून येत असल्यास राजूर मधून छत्रपति संभाजीनगर रस्त्यामार्गे जातेगाव पाटी पासून 10 किमी दक्षिण दिशेला हे रामेश्वर महादेवाचे ठिकाण आहे. महादेवाचे हेमाडपंती मंदिर असून ते डोंगराच्या मधोमध कोरलेले आहे. एका आख्यायिकेप्रमाणे येथे सीतेचे वास्तव्य होते. रामायणातील लव-कुश यांचे जन्मस्थळ म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते. येथे पाण्याच्या टाक्या, लेणी आहेत. तसेच या ठिकाणी ठिकठिकाणी डोंगरामध्ये गुहा कोरलेल्या असून त्या मध्ये राहण्यासाठी व्यवस्था केलेली दिसून येते . गडावरील कोरलेल्या गुहा आणि टाक्यांची दूरअवस्था बघून त्या बद्दल शासनाचे असलेले दुर्लक्ष आणि स्थानिकांची उदासीनता दिसून येते.