लपाछपी (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
लपाछपी
भाषा मराठी
प्रदर्शित इ.स. २०१७लपाछपी हा २०१७ सालचा   विशाल फुरिया दिग्दर्शित मराठी भयपट आहे. पूजा सावंत या अभिनेत्रीने चित्रपटात प्रमुख भुमिका केली असून उषा नाईक आणि विक्रम गायकवाड यांच्या भुमिका देखील महत्वाच्या आहेत.

कथानक[संपादन]

तुषार (विक्रम गायकवाड) याला पैसे परत करण्यासाठी गुंड मारहाण करतात. अधिक त्रासापासून  वाचण्यासाठी तो त्याची   गरोदर पत्नी नेहाला (पूजा सावंत) घेऊन त्याचा ड्रायव्हर भाऊरावच्या गावी जातो. गावात तुषार आणि नेहा या दोघांची ऊसाच्या मळ्यावरच्या घरात व्यवस्था केली जाते. भाऊराव आणि त्याची पत्नी तुळसाबाई (उषा नाईक) तुषार आणि नेहाची काळजी घेतात.  दोन दिवस झाल्यावर शहरातील परिस्थिती पहायला तुषार एका दिवसासाठी शहरात जातो. या एका दिवसात नेहाला तुळसाबाईच्या विचित्र स्वभावाचा अनुभव येतो. तसेच तिची तीन लहान मुलांबरोबर भेट होते. तुषार परत आल्यावर नेहा त्याचे मन वळवून त्याच्याबरोबर शहरात जायला निघते. पण भाऊराव आणि तुळसाबाई तुषारला आणि नेहाला मारहाण करून पकडतात आणि मांत्रिकाकडून त्यांच्यावर जादू करवतात. भाऊराव आणि तुळसाबाईच्या घरावर त्यांनी खून केलेल्या भावजयेच्या भूताचं सावट असतं. भावजयेचं भूत आठव्या महिन्यातील स्त्रिला झपाटून आठव्या महिन्यात तिचा गर्भपात करत असतं. भूताचे सावट नष्ट करण्या साठी त्यांच्या घरात गरोदर बाईने आठव्या महिन्यात तीन दिवस एकटे राहणे आवश्यक असते. यासाठीच भाऊरावाने तुषार आणि नेहाला मळ्यावर आणलेलं असतं. नेहा कशीबशी तीन दिवस घरात राहते आणि या तीन दिवसात तिला भयानक अनुभव येतात. या अनुभवातून तिला भाऊराव, तुळसाबाई आणि प्रतापराव यांनी भावजयेवर केलेल्या अत्याचाराची जाणीव तर होतेच पण तिला घरातील अमानुष प्रथा पण कळते. 

तीन दिवस झाल्यावर तुषार , तुळसाबाई आणि भाऊराव परत येतात. नेहा त्यांना तिला त्यांची पापकर्मे कळल्याचं सांगते आणि तुषारला तूच प्रतापराव असल्याचं सांगून तिथून पळते. प्रतापराव, भाऊराव आणि तुळसाबाई तिला मारायला तिच्या मागे धावतात. पण भाऊरावाची पहिली पत्नी मध्ये येऊन भाऊरावावर वार करते आणि नेहाला पळून जायला मदत करते.