Jump to content

लक्सा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कातोंग लक्सा (सिंगापूर)

लक्सा (मराठी लेखनभेद: लाक्सा ; भासा मलायू, भासा इंडोनेशिया: Laksa ; चिनी: 叻沙 ;) हे प्रामुख्याने मलेशिया, सिंगापूर व काही प्रमाणात इंडोनेशियात प्रचलित असलेले, चिनी व मलय खाद्यपद्धतींच्या संमिश्र प्रभावातून उद्भवलेल्या परानाकान खाद्यसंस्कॄतीतले शेवयांचे सूप आहे. लक्शाचे दोन प्रमुख प्रकार आढळतात - करी लक्सा आणि आसम लक्सा. करी लक्शात नारळाच्या दूध घालून शिजवलेल्या मसालेदार करीत घातलेल्या शेवया असतात, तर आसम लक्शात माशांच्या आंबटसर चवीच्या सुपात घातलेल्या शेवया असतात.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत