Jump to content

लंडनची महाआग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लंडनच्या महाआगीचे अज्ञात चित्रकाराने १६७५ मध्ये काढलेले चित्र. डावीकडे लंडन ब्रिज आहे; उजवीकडे टॉवर ऑफ लंडन . जुने सेंट पॉल कॅथेड्रल सर्वात उंच ज्वालांनी वेढलेले अंतरावर आहे.

लंडनची महाआग ही मध्य लंडनमध्ये रविवार २ सप्टेंबर ते गुरुवार ६ सप्टेंबर १६६ या कालावधीत पसरलेली एक मोठी आग होती, [] मध्ययुगीन लंडन शहराचा रोमन भिंतीच्या आतील जवळजवळ सगळा भाग आणि तसेच भिंतीच्या पश्चिमेकडीलही काही भाग यात जळून गेला. या आगीतील मृतांची संख्या तुलनेने कमी असल्याचे मानले जाते. [] []

Map of central London in 1666, showing landmarks related to the Great Fire of London
१६६६मधील मध्यवर्ती लंडन. आगीत जळालेला भाग गुलाबी रंगात आहे. आगीची सुरुवाती झालेली पुडिंग लेन हिरव्या रेघेत आहे

ही आग रविवारी २ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर पुडिंग लेनमधील एका बेकरीमध्ये सुरू झाली आणि वेगाने आसपासच्या इमारतींमध्ये पसरली. त्यावेळी अग्निशमन तंत्र म्हणजे मुख्यत्वे आगीच्या मार्गातील इमारती आणि जळण काढून टाकणे हे होते. त्यावेळच्या लंडनच्या महापौर सर थॉमस ब्लडवर्थ यांच्या अनिर्णयाकतेमुळे हे करण्यास मोठा उशीर झाला. जवळजवळ २४ तासांनी रविवारी रात्री मोठ्या प्रमाणावर पाडापाड करण्याचे आदेश दिले गेले पण तोपर्यंत सुरू झालेल्या वाऱ्याने बेकरीची आग फोफावली होती. आग सोमवारी उत्तरेकडे शहराच्या मध्यभागाकडे पसरत गेली. अशातच परदेशी लोक या आगी लावत असल्याच्या अफवा पसरल्याने रस्त्यांवरून संताप आणि समतोल ढळायला लागला. आगीत बेघर झालेल्या लोकांनी तेव्हा फ्रेंच आणि डच लोकांशी सुरू असलेल्या युद्धामुळे हेच लोक आगी लावत आहेत असा समज करून घेतला आणि फ्रांस आणि नेदरलँड्समधून लंडनमध्ये स्थलांतिरत झालेले लोक रस्त्यावरील हिंसाचाराचे बळी ठरले. मंगळवारीपर्यंत ही आग जवळजवळ संपूर्ण जुन्या शहरात पसरली. यात जुने सेंट पॉल कॅथेड्रल नष्ट झाले. लवकरच आगीने नदीपल्याड उडी मारली आणि व्हाइटहॉल येथील दुसऱ्या चार्ल्सच्या दरबारालाही धोका निर्माण झाली. या दरम्यान शहरभर अग्निशमन प्रयत्न नेटाने सुरू होते. गुरुवारी आग हळूहळू विझायला लागली. याची दोन मोठी कारणे म्हणजे इतके दिवस रोरावणारा पूर्वेकडून येणारा वारा मंदावणे आणि टॉवर ऑफ लंडन मधील शिबंदीने गनपावडर वापरून भराभर इमारती पाडून आगीचे भक्ष्य कमी करणे.

या महाआपत्तीमुळे लंडनमध्ये आणि पर्यायाने इंग्लंडमध्ये मोठ्या सामाजिक आणि आर्थिक समस्या निर्माण झाल्या. लंडनमधील बेघर आणि भिकेला लागलेल्या जनतेने वैतागून बंड करू नये म्हणून राजा चार्ल्सने लंडनवासीयांना लंडन सोडून इतरत्र स्थायिक होण्यासाठी मोठे प्रोत्साहन दिले. शहराच्या पुनर्बांधणीसाठी विविध योजना प्रस्तावित करण्यात आल्या. त्यांपैकी काही अगदी अचाट होत्या. आगीनंतर लंडनची पुनर्बांधणी साधारण जुन्या मध्ययुगीन योजनेवर करण्यात आली जी आजही अस्तित्वात आहे. []

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ All dates are given according to the Julian calendar. When recording British history, it is usual to use the dates recorded at the time of the event. Any dates between 1 January and 25 March have their year adjusted to start on 1 January according to the New Style.
  2. ^ Tinniswood, 131–135
  3. ^ Porter, 87
  4. ^ Reddaway, 27