रोझा पार्क्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोझा पार्क्स
Rosaparks.jpg
रोझा पार्क्स इ.स. १९५५ साली, मागे मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर
जन्म: फेब्रुवारी ४, इ.स. १९१३
टस्कगी, अलाबामा, संयुक्त राष्ट्रे
मृत्यू: ऑक्टोबर २४, इ.स. २००५
डेट्रोईट, मिशीगन, संयुक्त राष्ट्रे
चळवळ: कृष्णवर्णीयांचे नागरी हक्क
पती: रेमंड पार्क्स (१९३२-१९७७)
स्वाक्षरी: Rosa Parks Signature.svg


रोझा पार्क्स (फेब्रुवारी ४,१९१३ - ऑक्टोबर २४,२००५) या आफ्रिकन अमेरिकन नागरी अधिकार सुधारक कार्यकर्त्या होत्या. अमेरिकन काँग्रसने नंतर त्यांचा उल्लेख "आधुनिक काळातील नागरी अधिकार चळवळीची जनक" असा केला आहे.[१]

घटना व घडामोडी[संपादन]

रोझा पार्क्सची अटक
१ डिसेंबर, इ.स. १९५५ रोजी पोलिसांनी रोझा पार्क्सबाबत नोंदविलेला अहवाल, पान क्र. १
१ डिसेंबर, इ.स. १९५५ रोजी पोलिसांनी रोझा पार्क्सबाबत नोंदविलेला अहवाल, पान क्र. २
रोझा पार्क्सच्या बोटांचे ठसे.

इ.स. १९५५ सालातील १ डिसेंबर या दिवशी कृष्णवर्णीय असलेली रोझा पार्क्स ही त्याकाळात कृष्णवर्णीयांसाठी आरक्षित असलेल्या बसच्या मागील भागातील बाकड्यावर बसलेली होती. मधल्या एका थांब्यावर एक गोरा पुरुष बसमध्ये चढला आणि बसच्या ड्रायव्हरने रोझाला त्याच्यासाठी जागेवरून उठण्यास सांगितले. रोझाने बसमधील आपली जागा एका गोऱ्या व्यक्तीसाठी रिकामी करण्याचे नाकारले. रोझाच्या या कृत्याबद्दल तिला तुरुंगात डांबण्यात आले. रोझाच्या अटकेच्या निषेधार्थ सारा कृष्णवर्णीय समाज रस्त्यावर उतरला आणि मार्टिन ल्युथर किंग यांच्या नेतृत्वाखाली कृष्णवणीर्यांनी वंशभेदाचे धोरण राबविणाऱ्या शासकीय वाहतूक यंत्रणेच्या बसेसवर वर्षभर बहिष्कार टाकला.[२] रोझा पार्क्सच्या या एका प्रतिकाराच्या घटनेमुळे अमेरिकेतील नागरी हक्कांच्या चळवळीला सुरुवात झाली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "पब्लिक लॉ १०६-२६" (इंग्रजी भाषेत). ५ फेब्रुवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "अलाबामा ते ओबामा : कृष्णवणिर्यांची तेजस्वी वर्षे..." ६ फेब्रुवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)