रुचा पुजारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Rucha Pujari 1

रुचा पुजारी (जन्म: २ जुलै १९९४) ही भारतीय बुद्धिबळपटू आहे. तीने महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रभुत्व मिळवले आहे .[१]आणि यापूर्वी २००६ मध्ये त्यांना जागतिक बुद्धीबळ महासंघ (डब्ल्यूएफएम) यांच्याकडून पदवी देण्यात आली .[२]

रुचाचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापुरात झाला आहे.वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी बुद्धिबळ खेळामध्ये रस घेतला आणि त्यांच्या मोठ्या भावाकडून त्यांनी प्रथम चाली शिकल्या.वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी पहिली राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकले. तेव्हा त्यांची बुद्धिबळ खेळाविषयीची ओळख झाली . रुचा पुजारीने प्रथम सुरुवातीच्या वर्षांत उल्लेखनीय यश दर्शविले.आणि नंतर रुचाने करिअर म्हणून बुद्धिबळ क्षेत्राची निवड केली.

बुद्धिबळ कारकीर्द[संपादन]

जागतिक कार्यक्रम

रुचाने चार जागतिक युवा बुद्धीबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. [३][४]

विश्व कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत रुचाने दोनदा जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. हि जागतिक बुद्धीबळ स्पर्धा २०१३ मध्ये तुर्कीच्या कोकाली आणि पुणे,भारत २०१४ मध्ये येथे आयोजित करण्यात आली होती. [५][६]

आशियाई कार्यक्रम[संपादन]

९ वर्ष पूर्ण असताना रुचाने तिचा पहिला आशियाई कार्यक्रम खेळला.तिने आशियाई युवा १० वर्ष वयाखालच्या मुलींच्या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

२००३ मध्ये कॅलिकट येथे ही स्पर्धा आयोजित केली होती.त्या ठिकाणी तिने रौप्यपदक जिंकले.पुढील वर्षी सिंगापूरमध्ये झालेल्या याच स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले. पुजारीच्या वैयक्तिक पदकाबरोबरच तिने भारताला त्या स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकून दिलं.

राष्ट्रीय कार्यक्रम[संपादन]

पुजारीने सर्वात प्रथम २००१ मध्ये राष्ट्रीय स्पर्धा खेळली.रुचाने चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय ७ वर्ष खालील मुलींच्या गटाच्या स्पर्धामध्ये भाग घेतला आणि तेथे तिने पहिले राष्ट्रीय विजेतेपद मिळवून स्पर्धा जिंकली.[७]

२००७ मध्ये तिरुपती येथे झालेल्या स्पर्धेत तिच्या संघाने १४ वर्षाखालील मुलींच्या गटाने  सुवर्णपदक मिळवले.

२००८ मध्ये, पुजारीने मंगलोर येथे आयोजित राष्ट्रीय उप-कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.[८] पुढच्याच वर्षी ती  मुंबईमध्ये असलेल्या राष्ट्रीय उप-कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत गेली.

ऑगस्ट २०१० मध्ये, वयाच्या १६ व्या वर्षी पुजारीने गुवाहाटी येथे आयोजित राष्ट्रीय महिला आव्हानात्मक बुद्धिबळ स्पर्धेत भारतातील सर्वात मोठी स्पर्धा जिंकली.[९]

२०११ मध्ये गोव्यात झालेल्या राष्ट्रीय कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत पुजारीने उपविजेतेपद पटकावले.

राजस्थानच्या अजमेर येथे आयोजित २७ व्या राष्ट्रीय कनिष्ठ कन्या बुद्धीबळ स्पर्धेत तिने भाग घेतला.ती एक उल्लेखनीय कामगिरी २०१२ मध्ये केली होती.पुजारीने राष्ट्रीय शाळास्पर्धेमध्येही भाग घेतला होता. 

याशिवाय २०१३ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय महिला संघ स्पर्धेमध्ये पुजारीने भाग घेतला. तिच्या टीम पीएसपीबीने कांस्यपदक जिंकले, तिच्या वैयक्तिक कामगिरीबद्दल तिला रौप्य पदक देण्यात आले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "कोल्हापूरची ऋचा इंटरनॅशनल मास्टर". Maharashtra Times. 2019-10-21 रोजी पाहिले.
  2. ^ Staff. "Rucha Pujari awarded Women Fide Master title". https://www.oneindia.com (इंग्रजी भाषेत). 2019-10-21 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  3. ^ "WYCC 2009". wycc2009.tsf.org.tr. 2019-10-31 रोजी पाहिले.
  4. ^ "Twenty five Indians in full score at Slovenia | All India Chess Federation". web.archive.org. 2019-10-31 रोजी पाहिले.
  5. ^ "Sihite - Pujari | World Junior Chess Championship 2013 (05)". ChessBomb (इंग्रजी भाषेत). 2019-10-31 रोजी पाहिले.
  6. ^ "China's Lu Shanglei crowned World junior chess champ". www.sportskeeda.com (इंग्रजी भाषेत). 2019-10-31 रोजी पाहिले.
  7. ^ "Andhra kids rule the roost". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2002-01-01. ISSN 0971-751X. 2019-11-11 रोजी पाहिले.
  8. ^ "Outlook News". web.archive.org. 2019-11-11 रोजी पाहिले.
  9. ^ "Rucha crowned champion". www.telegraphindia.com (इंग्रजी भाषेत). 2019-11-11 रोजी पाहिले.