रिचर्डची तिरचिमणी
Appearance
रिचर्डची तिरचिमणी (इंग्लिश:Richard's Pipit; हिंदी:चरचरी, रुगाईल) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
माध्यम आकाराच्या चिमणीएवढी असते. वरील भागाचा वर्ण गर्द तपकिरी व त्यावर तांबूस चिन्हे. गर्द तपकिरी शेपटीची किनार पांढरीअसते. टी उडताना ठळकपणे दिसून येते. खालील भागाचा रंग पिवळट व छाती तपाकीरी. नर-मादी दिसायला सारखे असतात. तसेच धान चिमणीप्रमाणे पाय लांब असतात.
वितरण
[संपादन]बंगाल ते भूतान, पूर्वेकडे ब्रह्मदेश. भारतीय द्विपकल्पात क्वचितच आढळतात. पश्चिमेकडे फतेगडते गोवा यांना जोडणाऱ्या पूर्व सीमेवर. नेपाळ तराई व खाटमांडू खोरे. दक्षिणेकडे केरळ, तामिळनाडू व श्रीलंका, तसेच अंदमान बेटे.
निवासस्थाने
[संपादन]शेतीचा प्रदेश, धान्याची कापणी झाल्यानंतरची रिकामी राने. उजाड, डोंगराळ व वाळवंटी प्रदेश व गवताळ प्रदेश.
संदर्भ
[संपादन]- पक्षिकोष - मारुती चितमपल्ली