रिंगण (आषाढी वारी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पंढरीची वारी

रिंगण ही प्रतिवर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर यथे जाणा-या वारी मधील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे.

स्वरूप[संपादन]

वारी मार्गावर काही ठराविक गावांमध्ये रिंगण आयोजित होते. मोकळ्या माळरानावर किंवा मोठ्या मैदानावर साधारणपणे याचे आयोजन केले जाते.संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात त्यांचे अश्व सोबत असतात. रिंगण कार्यक्रमात या अश्वाचे महत्व विशेष असते.

कसे केले जाते[संपादन]

एक वारकरी

विविध दिंडी मधून वारीला अजाणारे वारकरी आपापल्या नियोजित जागी वर्तुळात उभे रहायचे असते. मध्यभागी अश्वाला धावण्यासाठी रस्ता मोकळा सोडला जातो. वारकरी गोलातच उभे राहून गजर सुरू करतात. ताल, मृदुंग अशी वाद्ये वाजविली जातात. हा गजर सुरू असताना अश्व रिंगणाच्या मधून धावतो. त्याच्या मागे वारकरी धावतात. रिंगण पूर्ण झाले की वारकरी झिम्मा, फुगड्या , मनोरे याचा आनंद घेतात.[१]

रिंगण कोठे होते[संपादन]

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी-[२]

  • चांदोबाचा लिंब
  • बाजीराव विहीर
  • वाखरी ( पंढरपूर जवळ)
  • माळशिरस
  • ठाकुर बुवा समाधी
  • भंडीशेगाव

संत तुकाराम म्हाराज पालखी-[३]

  • बेलवंडी
  • इंदापूर
  • अकलूज
  • बाजीराव विहीर
  • वाखरी

मेंढ्यांचे रिंगण[संपादन]

संत सोपान काका यांच्या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मेंढ्यांचे रिंगण होय.या सोहळ्यात बकर-यांचे रिंगण पिंपळी येथे होते. त्यानंतर इंदापूर येथे हे दुसरे रिंगण होते. हे रिंगण पहायला भाविक गर्दी करतात.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ पवार, गोकुळ (2022-06-17). "सिन्नरमध्ये रंगला वारकऱ्यांचा अभूतपूर्व वैष्णव रिंगण सोहळा". marathi.abplive.com. 2022-06-29 रोजी पाहिले.
  2. ^ "Aashadhi Wari 2022 पंढरपूर वारी : उभ्या रिंगणात अश्‍वांची नेत्रदिपक दौड". Maharashtra Times. 2022-07-09 रोजी पाहिले.
  3. ^ Marathi, TV9 (2022-07-02). "Pandharpur Wari 2022: इंदापूरात पार पडले तुकोबारायांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण, पहा व्हिडीओ". TV9 Marathi. 2022-07-09 रोजी पाहिले.
  4. ^ Marathi, TV9 (2022-07-03). "Pandharpur wari 2022: संत श्री सोपान काका महाराज यांच्या पालखीला मेंढ्यांचे रिंगण". TV9 Marathi. 2022-07-09 रोजी पाहिले.