Jump to content

राहत फतेह अली खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राहत फतेह अली खान

राहत फतेह अली खान (उर्दू: راحت فتح علی خان ) (९ डिसेंबर, इ.स. १९७३ - हयात ) हे कव्वाल गायक आहेत. कव्वाली शिवाय ते गझलाही गातात. बॉलीवूड आणि लॉलीवूड मध्ये ते पार्श्वगायक म्हणून प्रसिद्ध आहेत.

खान हे उस्ताद फारुख अली खान या मशहूर कव्वाल गायन उस्तादांचे पुत्र आणि फतेह अली खान यांचे नातू आहेत. ते नुसरत फतेह अली खान यांचे पुतणे आहेत.

राहत फतेह अली खान यांनी आपल्या काकाची सूफी गायनाची परंपरा पुढे नेली.

विवाद[संपादन]

२०१८ साली, नुसरत फतेह अली खान यांच्या मुलीने सांगितले की, तिच्या वडिलांची गाणी गाणाऱ्या गायकांच्या कॉपीराइट उल्लंघनाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा तिचा हेतू आहे. यावर राहतने प्रतिक्रिया दिली की ते नुसरतचे दत्तक उत्तराधिकारी असल्या कारणाने त्यांची गाणी गाण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही.[१]

जानेवारी २०१९ मध्ये, खानवर विदेशी चलनाची तस्करी केल्याचा आरोप होता आणि भारत सरकारच्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना समन्स बजावले होते.[२]

जानेवारी २०२४ मध्ये, 'पवित्र' पाण्याच्या बाटलीवरून खान घरातील नोकराला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता.[३]

अधिकृत संकेतस्थळ[संपादन]

राहत फतेह अली खान Archived 2013-04-12 at the Wayback Machine.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Rahat Fateh Ali Khan: Don't need permission to sing Nusrat Fateh Ali Khan's Qawwalis". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 4 June 2018. 12 March 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Pakistani Singer Rahat Fateh Ali Khan Accused of Smuggling Foreign Currency, ED Issues Notice". News18. 30 January 2019. 26 February 2019 रोजी पाहिले.
  3. ^ Dawn.com (2024-01-27). "Legendary singer Rahat issues apology, owns video of beating 'student' after online furor". DAWN.COM (इंग्रजी भाषेत). 2024-01-28 रोजी पाहिले.