Jump to content

रास्पबेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रुबस इडीअस (Rubus Idaeus) जातिची रास्पबेरी

रास्पबेरी एक बेरी वर्गीय फळ आहे. हे लाल रंगाचे फळ असते. त्याच्या झाडाला देखील रास्पबेरी म्हटले जाते. रास्पबेरी रोज (Rose) कुळातील रुबस (Rubus) प्रजातिची वनस्पती असून तिच्या अनेक जाति आहेत. ही झुडूप वर्गीय वनस्पती आहे. रास्पबेरी बारमाही झुडूप असून त्यामध्ये लाकडी खोड असते. रास्पबेरी मुख्यत: युरोपीय देशांमध्ये आढळते. युरोप वगळता अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशियामध्ये नेपाळ, चीन, फिलिपिन्स आणि भारतातील हिमालयालगतच्या जंगलांमध्ये रास्पबेरी आढळते.

ईगलनेस्ट अभयारण्यातील जंगली रास्पबेरी फळे.

वर्णन आणि गुणधर्म

[संपादन]

रास्पबेरी लाल रंगाच्या, रसाळ आणि चवीला गोड असतात. भारतामध्ये मुख्यत: गोल्डन एव्हरग्रीन रास्पबेरी आढळतात. या पिवळसर रंगाच्या असतात. काही प्रमाणात लाल व काळ्या रास्पबेरीही आढळतात. उत्तर भारतातील राज्यांमध्ये ग्रामीण भागातील लोक याला आखें, हीरे किंवा हिन्यूरे या नावाने ओळखतात.[१] रास्पबेरीमध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्व तसेच फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह इत्यादी खनिजे असतात.[१] त्याचबरोबर यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.[२]

वापर

[संपादन]

युरोपीय देशांमध्ये रास्पबेरीची लागवड केली जाते. रास्पबेरी चवीने खाल्ल्या जातात. त्यांच्यापासून वाईन, जॅम सारखे पदार्थ बनवले जातात. युरोपीय देशांमध्ये यांचा खाद्यपदार्थांमध्येही वापर केला जातो.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "विटामिन-सी से भरपूर है जंगली रास्पबेरी" (हिंदी भाषेत). 2019-08-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ जून, २०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "Nutrient data for raw raspberries, USDA Nutrient Database, SR-21" (इंग्रजी भाषेत). 16 April 2014 रोजी पाहिले.