Jump to content

रावणवाडी (भंडारा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रावणवाडी या पानावरून पुनर्निर्देशित)

रावणवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्याच्या भंडारा तालुक्यातील एक गाव आहे.नागपूर-भंडारा-रायपूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या धारगाव या गावापासून येथे जाण्यासाठी रस्ता आहे.रावणवाडी हे गाव भंडाऱ्यापासून सुमारे २२ किमी. लांब आहे.या गावाजवळच रावणवाडी जलाशय आहे.याबाजूलाच जंगलही आहे. हा परिसर एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. हे गाव आदिवासीबहुल आहे.

विशेषता

[संपादन]

हे गाव व त्याबाजूच्या परिसराचा गावकऱ्यांनी विकास केला व त्यास पर्यटनक्षम केले.येथील तरुणांनी एक सहकारी पर्यटनसंस्था स्थापन केली. त्यामुळे तेथील तरुणांना रोजगार मिळाला.या संस्थेत सर्व पदांवर तेथील गावकरीच आहेत. येथे मोबाईलशिवाय पर्यटन करणाऱ्यांना विशेष सवलत दिली जाते. त्यांना माफक दरात सर्व सुविधा पुरविल्या जातात. हा उपक्रम दर रविवारी राबविण्यात येतो. भंडारा येथून पर्यटकांना ने-आण करण्याचीपण व्यवस्था करण्यात आलेली आहे.तसेच या संस्थेतर्फे पर्यटकांना एक झाडाचे रोप देऊन वृक्षलागवडीचाही संकल्प करून घेतला जातो.

"प्लिज स्माईल, विदाउट मोबाईल" असे या आदिवासी गावाचे घोषवाक्य आहे.