Jump to content

रामदासी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१ले रामदासी साहित्य संमेलन पुणे येथे दिनांक १० मे २०१५ रोजी भरले होते. त्याचे उद्‌घाटन स्वामी गोविंददेवगिरी महाराज (पूर्वाश्रमीचे किषोर व्यास) यांनी केले.

या संमेलनात रामदासी वाङ्मयाचा प्रचार-प्रसार, समर्थ रामदास आणि त्यांच्या शिष्यांनी निर्माण केलेल्या वाङ्मयावर अनेक संशोधकांनी, सांप्रदायिकांनी केलेले काम या सर्वांचा एकत्रित विचार करण्याचा प्रयत्‍न झाला. संमेलनात समर्थ रामदासांनी स्वतः लिहिलेल्या रामेण रामदासेन लिखितं-वाल्मीकिरामायणम् - बालकांडं’ या पहिल्या खंडाचे प्रकाशन झाले. तसेच तंजावरचे महाराज प्रतापसिंह सरफोजीराजे भोसले यांनी लिहिलेल्या पुस्तकाचेही प्रकाशन समर्थवंशज सू. ग. स्वामी यांच्या हस्ते झाले. या संमेलनत आशिष केसकर यांचा धन्य ते गायनी कळा’ हा कार्यक्रम झाला.

शंकर अभ्यंकर यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला.


पहा : साहित्य संमेलने