रामघळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आपणा सर्वानाच रायगडमधील समर्थ रामदासांची पवित्र शिवथर घळ ब-यापैकी माहीत आहे.याच पंक्तीतली एक सुंदर घळ सातारा जिल्ह्यातील कोयनानगरजवळ आहे. तिचं नाव ‘रामघळ’. समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रामघळ काहीशी अपरिचित आहे.

सातारातून कोयनानगरला जावे. तिथून कुंभार्ली घाटरस्त्यावरच हेळवाक नावाचे गाव लागते. या गावाच्या डाव्या बाजूलाच रामघळीकडे जाण्यासाठी वाट आहे. ही वाट चाफ्याचा खडक येथील धनगरपाडयापर्यंत जाते.याच गावावरून साता-यातील दुर्गमात दुर्गम अशा भैरवगडाच्या वाटेवर एक फाटा फुटतो. येथून तासाभराच्या अंतरावर ही निसर्गरम्य रामघळ आहे.[ संदर्भ हवा ]

अर्धचंद्राकृती आडवी पसरलेली ही रामघळ आत जवळपास वीस फुटांपर्यंत आहे. वर डोक्यावर दगडाचे छप्पर.हा सारा परिसर निबीड चांदोळी अभयारण्यात स्थित आहे.