राजेंद्र अग्निहोत्री
Appearance
राजेंद्र अग्निहोत्री (१९३८ - २००८) हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकींमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील झांसी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते १९८० ते १९८५ दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभा सदस्य देखील होते.
इ.स. १९६३ ते १९८५ दरम्यान अग्निहोत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते.