Jump to content

राजशेखर (नाटककार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजशेखर हा इ.स.च्या १०व्या शतकात होऊन गेलेला महाराष्ट्री प्राकृतसंस्कृत भाषांतील नाटककार, कवी होता. गुर्जर प्रतिहारांचा राजा पहिला महेंद्रपाल याच्या राजसभेत हा कवी होता. याने लिहिलेले महाराष्ट्री प्राकृतातील कर्पूरमंजरी हे नाटक विशेष ख्यात आहे. खेरीज बालरामायण हे संस्कृत नाटक, काव्यमीमांसा नावाचा काव्यशास्त्राची मीमांसा करणारा संस्कृत ग्रंथ इत्यादी साहित्यकृतींचाही हा कर्ता आहे.

जीवन

[संपादन]

राजशेखर त्याच्या बालरामायण या संस्कृत नाटकात अकालजलद या आपल्या पणजोबांचा उल्लेख "महाराष्ट्रचूडामणिः" असा करतो [१], त्यावरून हा मूळचा महाराष्ट्रीय असावा असे विद्वानांचे मत आहे. कर्पूरमंजरी नाटकात याने लिहिलेल्या "चाहुआण कुलमोलिमालिआ राअसेहरकइन्दगेहिणी" या उल्लेखानुसार, याची पत्नी अवंतीसुंदरी ही चव्हाणकुळात जन्मली होती[१].

साहित्य

[संपादन]
साहित्यकृती भाषा साहित्यप्रकार
कर्पूरमंजरी महाराष्ट्री प्राकृत नाटक
बालरामायण संस्कृत नाटक
काव्यमीमांसा संस्कृत काव्यशास्त्र मीमांसा

हेही वाचा

[संपादन]

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ a b सहस्रबुद्धे, पु.ग. महाराष्ट्र संस्कृती. p. २६.