राजकुमार हिरानी
Jump to navigation
Jump to search
राजकुमार हिरानी | |
---|---|
![]() | |
जन्म |
२२ नोव्हेंबर, १९६२ नागपूर |
राष्ट्रीयत्व | भारत |
कार्यक्षेत्र | दिग्दर्शक, निर्माता, कथाकार |
कारकीर्दीचा काळ | १९९३-चालू |
राजकुमार हिरानी (जन्म: २२ नोव्हेंबर १९६२) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहे. सिंधी वंशाचा असलेल्या व नागपूरमध्ये जन्मलेल्या हिरानीने विधू विनोद चोप्राचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काही चित्रपटांमध्ये भाग घेतला. २००३ साली त्याने स्वतः प्रमुख दिग्दर्शक बनून मुन्ना भाई एम.बी.बी.एस. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हिरानीने त्यानंतर लगे रहो मुन्ना भाई व ३ इडियट्स ह्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून हे तिन्ही चित्रपट तिकिट खिडकीवर प्रचंड यशस्वी झाले. हिरानीला आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.
चित्रपट यादी[संपादन]
दिग्दर्शक[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील राजकुमार हिरानीचे पान (इंग्लिश मजकूर)