राखी रानकोंबडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
राखी रानकोंबडा
राखी रानकोंबडा

राखी रानकोंबडी, कोंबड, खैरी कोंबडी किंवा करडी जंगली कोंबडी (इंग्लिश:Grey Junglefowl; हिंदी: जंगली मुर्गी, भुरी जंगली मुर्गी; संस्कृत: कुक्कुट,यवग्रीव वन कुक्कुट; गुजराती: जंगली मरघी) हा एक कोंबडी कुळातील पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने गावठी कोंबडीएवढा असतो. कोंबड्याचा रंग राखी असतो व त्यावर काड्या शेपटीला काळी विळ्यासारखी पिसे असतात. लाल व राखी कोंबड्याच्या मादीत फरक असतो. राखी कोंबडीची छाती पांढरी व तिच्यावर काळी किनार असलेली पिसे असतात. त्यामुळे ती खवल्यांसारखी दिसतात. हे पक्षी एकटे किंवा समूहाने राहतात.

वितरण[संपादन]

हा पक्षी भारतीय द्वीपकल्पात अबूचा पहाड, पचमढी, गोदावरीचे मुख या सीमा असलेल्या प्रदेशात आढळतो. राखी आणि तांबडे कोंबडे जेथे-जेथे जवळ राहतात. तेथे-तेथे त्यांच्या संकरातून एक नवीनच जात निर्माण होते. फेब्रुवारी ते मे हा या पक्ष्याच्या वीणीचा काळ आहे..

निवासस्थाने[संपादन]

राखी रानकोंबडी शुष्क पानगळीच्या जंगलात तसेचदमट सदापर्णी वनातील विरळ क्षेत्रात आढळतात. पर्वतीय प्रदेशात शिखरापर्यंत आढळतात

संदर्भ[संपादन]

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली