राखी बल्गुली
शास्त्रीय नाव | Parus major |
---|---|
कुळ | टीटाद्य (Paridae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश | Great Tit |
संस्कृत | भस्म बल्गुली |
हिंदी | रामगंगरा |
वर्णन
[संपादन]राखी बल्गुली हा पक्षी आकाराने चिमणी एवढा, पाठीकडून राखाडी रंगाचा, पोटाकडून पांढरा, डोके काळे, गाल, कंठ आणि छाती पांढऱ्या रंगाचे, तर पंखावर तुटक पांढऱ्या-काळ्या रेषा असलेला पक्षी आहे. याच्या रंग आणि आकारावरून अनेक उपजाती आहेत.
राखी बल्गुली नराचा आवाज (सहाय्य·माहिती)
वास्तव्य/आढळस्थान
[संपादन]भारत, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान या भारतीय उपखंडातील देशांमध्ये राखी बल्गुलीच्या किमान सात उपजाती आढळतात. तसेच युरोप, मध्य-पूर्व, मध्य आणि उत्तर आशिया, उत्तर आफ्रिका येथील देशांमध्येही विविध उपजाती आढळतात.
खाद्य
[संपादन]राखी बल्गुली हा गवताळ कुरणे, पानगळीची विरळ जंगले, शेतीचे प्रदेश या ठिकाणी फळातील रस, कीटक, त्यांची अंडी, सुरवंट, विविध बिया खात एकट्याने किंवा लहान थव्याने फिरणारा पक्षी आहे.
प्रजनन काळ
[संपादन]साधारणपणे फेब्रुवारी ते सप्टेंबर हा काळ राखी बल्गुलीचा प्रजनन काळ असून सहसा एका वर्षात दोनदा यांची वीण होते. गवत, पिसे वगैरे वापरून झाडाच्या ढोलीत किंवा कडेकपारीत असलेल्या फटीत, जमिनीपासून १ ते ५ मी. उंचीवर घरटे तयार केले जाते. मादी एकावेळी ८ ते १०, पांढऱ्या-गुलाबी रंगाची त्यावर लालसर-तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. अंडी उबविण्याचे काम एकटी मादी करते पण पिलांना खाऊ घालणे, देखभाल नर-मादी मिळून करतात.
चित्रदालन
[संपादन]-
राखी बल्गुलीची भारतातील उपजात
-
राखी बल्गुलीची एक उपजात (नर)
-
Parus major terraesanctae
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |