Jump to content

रससदन भाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रससदन या भाणाचा नेमका कर्ता कोण आहे ते ज्ञात नाही. तो स्वतःस युवराज म्हणवितो. तो केरळ प्रदेशांतील कोटिलिंग या गांवचा रहिवासी असावा. बार्नेट या पंडिताच्या मते तो व सदाशिव हे एकच होत.

या अर्धपरिचित लेखकाने रचलेले कथानक किती रसभरित आहे ते पहावे.

रससदनचे कथानक

[संपादन]

या रससदन भाणाचा नायक प्रमुख वीट होता इतकेच काय ते त्याचे वर्णन केलेले आहे. आपल्या मंदारक नावाच्या मित्राच्या गैरहजेरीत, त्याच्या खंडनमाला नावाच्या प्रेरयसीला मदत करण्याचे वचन तो मंदारकाला देतो. हा नायक तिच्याबरोबर देवदर्शनास जातो; तिला घेऊन फिरावयास जातो; एके प्रसंगीं एका मदोन्मत हत्तीला पकडल्याचा देखावाही ते पाहातात; तिला घरी पोहोंचविण्याकरिता तो तिच्याबरोबर जातो; आणि शेवटी तिला घरी सोडून तो आपल्या प्रियतमेकडे जातो. तिथे तो प्रियतमेशी विनोदपूर्ण भाषण करतो; तेथून निघून आपल्या तरुण मित्रांबरोबर गप्पा मारतो, काही बाबतीत त्यांस सल्ला देतो; त्यांच्या प्रेमपात्रांशी भेटी जुळवून देतो, वगैरे.

हा नायक एका दुसऱ्या गावच्या तरुणींकडून बोलावणे आल्यामुळे त्यांना भेटावयास जातो. अशा रीतीनें रमत गमत अखेर तो खंडनमालेकडे येतो, तेव्हा तेथे मंदारक परत आलेला त्याच्या दृष्टीस पडतो, इत्यादी कथाभाग या भाणात आहे.

हे सर्व प्रसंग जेव्हा एकच पात्र रंगभूमीवर सादर करीत असेल तेव्हा त्याच्या अभिनयकौशल्याची कसोटी लागत असेल.


पहा : भाण