रडीचा डाव
Appearance
रडीचा डाव किंवा 'रडीचा खेळ' म्हणजे,एखादा भारतीय खेळ खेळतांना व खेळात बाद होण्याइतपत चूक झाली असतांनादेखील ती मान्य न करणे व आपलेच तयार केलेले खेळाचे नियम समोर दामटणे होय. सहसा, एखादा खेळ खेळत असलेल्या सर्वसाधारण वयोगटापेक्षा मोठ्या वयाची मुले खेळात भाग घेत असतांना हा प्रकार उद्भवतो. त्यांचे दबावापोटी तो/ती सांगत असलेले नियम इतर सवंगड्यांना नाईलाजाने मान्य करावे लागतात.
या प्रकारच्या खेळानंतर चर्चा करीत असतांना, इतर सवंगडी मग तो 'रडीचा डाव' खेळला असे म्हणतात.