Jump to content

रक्तसृति

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रक्तसृति हा एक आयुर्वेदिक उफचार आहे.

तो दरसाल करणाऱ्या स्वस्थ मनुष्याला त्वचेचे रोग, गाठी, सूज व रक्तदुष्टीने होणारे रोग केव्हाही होणार नाहीत. विसर्प, विद्रधी, प्लीहा, गुल्म, अग्निमांद्य, ज्वर, मुखनेत्रशिरोरोग, मद, तहान, कुष्ठ, वातरक्त, रक्तपित्त, कडू व आंबट घशाशी येणे, भ्रम व रक्तदुष्टीने होणारे विकार यांवर रक्त काढावे. वेदना, शूल होत असेल तेथले रक्त काढल्यास ताबडतोब थांबतो. फासण्या, जळवा, तुंबडी, शिंग या साधनांनी व शीर तोडून रक्त काढतात. फासण्या इ. क्रमाने उत्तरोत्तर साधनाने अधिकाधिक खोल भागांतील दुष्ट रक्त काढावयाचे असते. सार्वदेहिक अशुद्ध रक्त काढण्याकरिता शीर तोडून रक्त काढावयाचे असते. हा एक शरीरशुद्धीचा उपचार आहे, तो सर्व विधिपूर्वक करावा.

वैशिष्ट्य

[संपादन]

ज्या स्थानात रोग असतो त्या स्थानातील किंवा जवळच्या स्थानातील शीर तोडून रोगस्थानातले दुष्ट रक्त काढले जाणे स्वाभाविक आहे. पण काही रोगांत ज्या शिरा तोडण्यास सांगितल्या आहेत त्यांचा व त्या रोगाचा संबंध लक्षात येत नाही. उदा., अपचीमध्ये (जुन्या गंडमाळामध्ये) पायातील पोटरीतील, गलगंडात मांडीतील, प्लीहा रोगात डाव्या कोपरातील किंवा शेवटच्या दोन बोटांतील शिरा मोडून रक्त काढावयास सांगितले आहे. हा संशोधनाचा विषय आहे.

वर्ज्य

[संपादन]

क्षीण मनुष्याचे आंबट खाण्याचा सवयीने दुष्ट झालेले रक्त, तसेच सर्वांग सूज व पांडुरोगी, मूळव्याध, उदर, क्षय व गर्भिणी यांची सूज यांचे रक्त काढू नये.