रंगनील (नाट्यसंस्था)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतामधील महाराष्ट्र राज्यात कोकणातील रायगड जिल्ह्यात पनवेल हे गांव आहे. पनवेलमधील नाट्यकलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तेथील कल्पना कोठारी यांनी इ.स.१९९६मध्ये रंगनील नावाची नाट्यसंस्था स्थापन केली. सुरुवातीला त्यांनी बालनाट्य शिबि्रे भरवण्यास आरंभ केला. त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसे. मग शिबीर संपल्यावर कल्पना कोठारी यांनी स्थानिक पातळीवर नाटके बसवून घ्यायला सुरुवात केली. त्यांतून तयार झालेल्या पन्‍न्‍नासाहून अधिक बालकलाकारांना त्यांनी व्यावसायिक बालरंगभूमीवर उतरवले. प्रवीण दवणे यांनी लिहिलेले ’तिरक्या डोक्याचा’ या, रंगनीलच्या बालकलाकारांनी भूमिका केलेल्या बालनाट्याचे एका वर्षात पंचविसाहून जास्त प्रयोग झाले आहेत.

रंगनीलचे नाट्यप्रयोग मुंबईत तसेच ठाणे, पुणे आणि रायगड या जिल्ह्यांत होतात. त्यासाठी तीसएक मुलांना बसने त्या त्या गावी नेले जाते. नाटकांमध्ये प्रकाश निमकर आणि कल्पना कोठारीच्या भगिनी संजीवनी बेलापूरकर या नाटकात भाग घेणाऱ्या मुलांची वेशभूषा करतात.