योल्तेओत्ल
Appearance
योल्तेओत्ल हा एक नाहुआ शब्द असून त्याचा अर्थ "ईश्वराचे हृदय" किंवा ज्या कोणात आध्यात्मिक निर्मितीक्षमता आहे तो होय.[१]. हा शब्द योलोत्ल (हृदय) आणि तेओत्ल (देव, ईश्वर, आत्मा, शक्ति किंवा हालचाल) ह्या दोन शब्दांपासून बनलेला आहे. याकी/चिकाना आध्यात्मात योल्तेओत्लची कॅथलिक पवित्र हृदय/पवित्र मनाची संकल्पनेची (स्पॅनिश: एल साग्रादो कोरासोन) तुलना केली जाते.[२]
तात्त्विक दृष्ट्या, वैयक्तिक प्रयत्नांतून विश्वाची एकरूपता साधण्याची स्थिती अशी योल्तेओत्लची संकल्पना असून ते निर्वाण ह्या बौद्ध संकल्पनेच्या जवळ जाते. तथापि, निर्वाण हे ज्ञानप्रकाशाचे अंतर्गत रूप असून योल्तेओत्ल ही निर्मितीच्या दिशेने जाणाऱ्या ज्ञानप्रकाशाचे बहिर्गत रूप होय.
संदर्भ
[संपादन]- ^ Vento, Arnoldo C. Rediscovering the Sacred: From the Secular to a Postmodern Sense of the Sacred, p.199 in Wicazo Sa Review, Vol. 15, No. 1, The Secular Past, the Mythic Past, and the Impending Future. (Spring, 2000), pp. 183–205. Stable URL: http://links.jstor.org/sici?sici=0749-6427%28200021%2915%3A1%3C183%3ARTSFTS%3E2.0.CO%3B2-5
- ^ Broyles-Gonzalez, Yolanda. "Indianizing Catholicism: Chicana/India/Mexicana indigenous spriritual practices in our image." in Cantu, Norma E. and Najira-Ramirez, Olga (Eds.) "CHICANA TRADITIONS: CONTINUITY & CHANGE." (2002). Ch. 6, p.128. IL: Univ. of Illinois Press. [Available online in "google-scholars" search].